Saturday, August 2, 2025

The NIA Q1 Share: न्यू इंडिया ॲशुरन्स कंपनीच्या तिमाही निकालानंतर बाजारात शेअर ९.०४% उसळला 'या' गोष्टींमुळे

The NIA Q1 Share: न्यू इंडिया ॲशुरन्स कंपनीच्या तिमाही निकालानंतर बाजारात शेअर ९.०४% उसळला 'या' गोष्टींमुळे

मोहित सोमण: द न्यू इंडिया ॲशुरन्स कंपनीच्या (NIA) तिमाही निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये थेट ७.१६% वाढ सकाळी ११ वाजेपर्यंत झाली आहे. तर ११.१५ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्सने ९.०४% उसळी घेतली आहे. ही शेअर मधील तुफानी प्रामुख्याने म जबूत तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर झाली आहे. कंपनीने आज तिमाही निकाल जाहीर केला ज्यामध्ये कंपनीला ८०% करोत्तर नफा (PAT Profit after tax) प्राप्त झाला आहे. इयर ऑन इयर बेसिसवर कंपनीच्या मागील वर्षीच्या २१७ कोटींच्या तुलनेत यावर्षी ति माहीत ३९१ कोटींवर गेला आहे. कंपनीच्या करपूर्व नफ्यात (Profit before tax PBT) इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) मागील वर्षाच्या तिमाहीतील २५६ कोटींहून वाढत ३८९ कोटींवर गेला आहे.


विशेषतः कंपनीच्या ऑपरेटिंग खर्चात (Operating Expenses) मागील पहिल्या तिमाहीतील १११६ कोटींच्या तुलनेत या पहिल्या तिमाहीत ८५२ कोटीवर घसरण झाली आहे. गुंतवणूकीतून प्राप्त केलेल्या कमाईत (Investment Income) इयर ऑन इयर बेसिस वर मागील तिमाहीतील १८५२ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत २२९० कोटींवर गेले. कंपनीच्या स्थूल रिटर्न प्रिमियममध्ये (Gross Written Premium) मध्ये मागील वर्षी तिमाहीतील ११७८७.९२ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत १३३३३.५८ कोटींवर वाढले आहे. कंप नीच्या व्यवस्थापना अंतर्गत मालमत्ता (Asset Under Management AUM) मध्ये वाढ झाल्याने या तिमाहीतील मालमत्ता १००८०२ कोटीवर गेले आहे. घरगुती प्रिमियम संकलनात इयर ऑन इयर बेसिसवर ८.८४% वरून वाढ होत १५.२७% वाढ झाली आहे.


तिमाहीतील निकालावर व्यक्त होताना द न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेडच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक सुश्री गिरीजा सुब्रमण्यम यांनी निकालांवर भाष्य करताना म्हटले आहे की, 'मला तुम्हाला कळवताना खूप आनंद होत आहे की NIACL ने १३३३४ कोटींचा एकूण लेखी प्रीमियम मिळवला आहे, जो Q1FY26 मध्ये १३.११% ची वार्षिक वाढ दर्शवितो. या कालावधीत देशांतर्गत एकूण थेट प्रीमियम उद्योगाच्या तुलनेत १५.२७% ने वाढला जो ८.८४% ने वाढला. परिणामी, या कालावधीसाठी आमचा बाजार हिस्सा १४.६५% वरून १५.५१% पर्यंत वाढला. सध्याच्या स्पर्धात्मक तीव्रतेचा विचार करता आम्ही अधिक सावध दृष्टिकोन बाळगला आहे, परंतु मोटर LOB मध्ये कमी वाढ असूनही देशांतर्गत व्यवसायात निरोगी वाढ दर होता. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ११६.१६ % चे एकत्रित प्रमाण स्थिर होते. अग्निशमन, अभियांत्रिकी आणि आरोग्य पोर्टफोलिओमध्ये निरोगी वाढ नोंदवली गेली'


एअर इंडियाच्या विमानातील दुर्दैवी घटनेचा अंडररायटिंग निकालांवर विपरीत परिणाम झाला. आरोग्य विभागात तोटा प्रमाण किंचित जास्त दिसून आले आणि काही मोठ्या तोट्यांचा परिणाम दायित्व आणि विविध पोर्टफोलिओवरही झाला. याव्यतिरिक्त, काही लीगेसी नॉन-मूव्हिंग बॅलन्ससाठी तरतुदी करण्यात आल्या ज्या चांगल्या गुंतवणूक उत्पन्नाने ऑफसेट केल्या गेल्या. करपश्चात नफा ८०% ने वाढून ३९१ कोटी झाला. आमचा बॅलन्स शीट मजबूत राहिला आहे, व्यवस्थापनाखालील मालमत्ता १,००,८०२ कोटी आणि निव्वळ मूल्य ४५४१४ कोटी आहे. सॉल्व्हन्सी रेशो १.८७ पट स्थिर होता असेही त्या पुढे म्हणाल्या आहेत.  सकाळी सत्राच्या सुरुवातीला शेअर्समध्ये ९% हून अधिक वाढ झाली होती. याशिवाय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार,१९ मे २०२५ रोजी झालेल्या न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीच्या बोर्डाच्या बैठकीत, रेमा देवी वेट्टुवोट, जीएम यांची कंपनीच्या मुख्य अंडररा यटिंग ऑफिसर म्हणून १९ मे २०२५ पासून नियुक्ती करण्यास मान्यता दिली गेली असून ३० एप्रिल २०२५ रोजी त्यांच्या निवृत्तीनंतर मुक्ता शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बोर्डाने १९ मे २०२५ पासून कंपनीच्या मुख्य विपणन अधिकारी म्हणून प्रशांत बि स्वास, जीएम यांची नियुक्ती केली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा