Sunday, October 26, 2025
Happy Diwali

गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली; २ जवान शहीद, ३ गंभीर

गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली; २ जवान शहीद, ३ गंभीर

लेह : लडाखमधील गलवान खोऱ्यात मोठी दुर्घटना घडली. खोऱ्यातील चारबाग भागात लष्कराच्या वाहनावर एक मोठी दरड कोसळली. त्यामुळे वाहनाचे प्रचंड नुकसान झाले असून वाहनात प्रवास करणारे दोन अधिकारी शहीद झाले, तर तीन अधिकारी गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, १४ सिंध हॉर्सचे लेफ्टनंट कर्नल मनकोटिया आणि दलजीत सिंग अशी शहीद जवानांनी नावे आहेत. तर मेजर मयंक शुभम (१४ सिंध हॉर्स), मेजर अमित दीक्षित आणि कॅप्टन गौरव (६० आर्म्ड) जखमी झाले आहेत. सैनिकांचा ताफा दुर्बुक ते चोंगटास येथे प्रशिक्षण सहलीवर होता. बुधवारी(दि.३०) सकाळी ११:३०च्या सुमारास दुर्बुकहून चोंगताशला जाणारे लष्करी वाहन भूस्खलनात अडकल्याने हा अपघात झाला. जखमी सैनिकांना लेह येथील १५३ जीएच येथे नेण्यात आले आहे. या अपघाताबाबत, भारतीय लष्कराच्या अग्निशमन आणि फ्युरी कॉर्प्सने माहिती दिली आहे की, ३० जुलै रोजी सकाळी ११:३० वाजता लडाखमध्ये लष्करी ताफ्याच्या वाहनावर दगडावरून दगड पडला. बचावकार्य सुरू आहे.

Comments
Add Comment