जम्मू-काश्मीर: पूंछमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील पुंछ सेक्टरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. या ठिकाणी भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे ऑपरेशन केले.


मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांना पूंछ सेक्टरमध्ये दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली. शोधमोहिमेदरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले.


या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. सध्या या परिसरात शोधमोहीम अजूनही सुरू आहे, जेणेकरून इतर कोणताही दहशतवादी लपून बसला असेल तर त्याला शोधता येईल. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Iran Israel War, Tehran : तेहरानजवळील निवासी इमारतीवर बॉम्ब हल्ला, १३ जणांचा मृत्यू

तेहरान : सोमवारी पहाटे इराणची राजधानी तेहरानच्या दक्षिण-पश्चिम भागातील इस्लामशहरजवळ एका निवासी इमारतीवर

Uttar Pradesh Accident: बोलेरोने मागून उभ्या असलेल्या टँकरला दिली धडक; अपघातात ५ जण ठार, अनेक जण जखमी

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सीबीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील

Himachal Pradesh Avalanche : अटल बोगद्याजवळ हिमस्खलन; सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही

हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळ असलेल्या अटल टनल रोहतांगच्या टोकाजवळ हिमखंड कोसळल्याची घटना घडली आहे. दोन

Nitish Kumar : नितीश कुमार १० एप्रिल रोजी राज्यसभा सदस्यत्वाची घेणार शपथ

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेत प्रवेश करण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्या शपथविधीची तारीखही

Google Gemma 4 : एआय क्षेत्रात गुगलचा मोठा धमाका; GPT-5 आणि Llama 4 ला तगडी स्पर्धा

मुंबई : तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी Google ने आपले अत्याधुनिक आणि ‘ओपन-सोर्स’ कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल Gemma 4

Pakistan Threatens To Target Kolkata : पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली भारताला धमकी; कोलकाता शहर पाकिस्तानच्या टार्गेटवर?

- शाहीन ३ मिसाइलच्या जोरावर पाकिस्तानचा भारताला धमकी देण्याचा नाहक प्रयत्न मुंबई :