Donald Trump: ट्रम्प यांचा आणखी एक टेरिफ बॉम्ब? २० ते २५% टेरिफ लागणार

प्रतिनिधी: डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक टेरिफ बॉम्ब काल उशीरा टाकला आहे. अजून निश्चित नाही पण भारतावर २० ते २५% टेरिफ लागू शकतो' असे डोनाल्ड ट्रम्प वार्ताहरांशी बोलताना म्हणाले आहेत. 'अजून यावर निश्चित बोलणी झाली नाही मात्र अद्याप द्विपक्षीय बोलणी सुरू असल्याने १ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर यावर निर्णय अपेक्षित आहे ' असे पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी नमूद केले आहे. ज्यावेळी ट्रम्प यांना नव्या दिल्लीविषयी प्रश्न विचारला असता त्यावर ट्रम्प बोलत होते. 'भारत आमचा मित्र पण बहुतेक देशांपेक्षा भारताने अधिक टेरिफ लावले.' असा टोला त्यांनी हाणत भारताला लक्ष्य केले आहे.तसेच अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांनी सोमवारी सांगितले होते की, 'अमेरिकेला भारताशी चर्चा करण्यासाठी अधिक वेळ हवा आहे जेणेकरून अमेरिकन निर्यातीसाठी आपला बाजार अधिक खुला करण्याची भारताची तयारी तपासता येईल. रॉयटर्सने मंगळवारी पूर्वी वृत्त दिले होते की नवी दिल्ली २०% ते २५% दरम्यान जास्त शुल्क आकारण्याची तयारी करत आहे.'

संबंधित प्रतिकिया ट्रम्प यांनी पाच दिवसीय स्कॉटलंड दौऱ्यातून परतताना दिली. युएसला जगभरातील व्यापारी धोरणात सन्मानजनक वागणूक मिळाली पाहिजे असा पवित्रा त्यांनी यावेळी घेतला होता. दरम्यान टेरिफ शुल्कवाढ २ एप्रिल २०२५ रोजी घोषित करत ते ९ जुलै २०२५ पासून लागू होणार होते. तथापि आयात शुल्क लागू करण्याची अंतिम मुदत नंतर १ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढविण्यात आली. नुकत्याच करारात अमेरिकेने आतापर्यंत यूके, इंडोनेशिया, फिलीपिन्स, युरोपियन युनियन आणि जपानसोबत यशस्वी डील (Tariff Deal) केले होते.

प्रसारमाध्यमांना दिलेल्या सुत्रांच्या माहितीनुसार, 'तात्पुरत्या उपाययोजना म्हणून निवडक निर्यातींवर २०% ते २५% पर्यंत जास्त कर लावण्याची शक्यता लक्षात घेऊन नवी दिल्ली पुढील तयारी करत आहे. नवीन सवलती देण्याऐवजी, भारत ऑगस्टच्या मध्यात अमे रिकन शिष्टमंडळाच्या भेटीदरम्यान व्यापक व्यापार चर्चा पुन्हा सुरू करण्याची योजना आखत आहे.' यापूर्वी शिष्टमंडळाने ट्रम्प प्रशासनाची भेट घेत बोलणी केली होती. मात्र त्यावर अपेक्षित बोलणी न झाल्याने हाती निराशाच आली.

आता पुढील घडामोडींवर बो लतांना सुत्रांनी सांगितले की,' चर्चा चांगल्या प्रकारे प्रगती करत आहेत आणि ऑगस्टच्या मध्यापर्यंत एक शिष्टमंडळ दिल्लीत येण्याची अपेक्षा आहे.'. याखेरीज पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाक युद्धात 'मी' पुढाकार घेतल्याने युद्धबंदी झाली असे ट्रम्प यांनी म्हणत स्वतः ची खुशामत यानिमित्ताने केली.
Comments
Add Comment

Justice Yashwant Varma : न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध; संसदेत चौकशी समितीचा अहवाल सादर

नवी दिल्ली: न्यायाधीशांच्या अधिकृत निवासस्थानी जळित नोटांची बंडले सापडल्याप्रकरणी वादात सापडलेले माजी

Ahilyanagar : हृदयद्रावक ! भीषण अपघातात उद्योजकासह दोघांचा जागीच मृत्यू ; परिसरात हळहळ

Ahilyanagar : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर शिरूर बायपासजवळ मंगळवारी भीषण अपघाताची घटना घडली. मंगळवारी सायंकाळी कंटेनर,

Karnataka Bandh : कावेरी पाणीवाटपाच्या विरोधात कर्नाटक बंद; जाणून घ्या काय सुरू, काय राहणार बंद?

बंगळुरू : कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने (CWMA) १२ ऑगस्टपासून पुढील १५ दिवस तमिळनाडूला दररोज १२ हजार क्युसेक

Nashik : श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिर १७ तास खुले

Nashik : श्रावण महिन्यानिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी करत असतात.

Independence Day 2026 : महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष! जाणून घ्या मुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांपर्यंत कुठे कोण फडकवणार तिरंगा?

मुंबई : भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी देशभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

Pratap Sarnaik : एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

१ कोटींहून अधिक प्रवाशांची नोंदणी; ६४ लाखांहून अधिक कार्डे