Sunday, August 31, 2025

ट्रम्प भारतावर भडकले, घेतला टोकाचा निर्णय

ट्रम्प भारतावर भडकले, घेतला टोकाचा निर्णय

वॉशिंग्टन डी. सी. : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के आयातशुल्क (कर) अर्थात टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांचा हा निर्णय १ ऑगस्टपासून लागू होईल. ट्रम्प यांनी ट्रूथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिली आहे. अमेरिका १ ऑगस्टपासून भारतातून आयात होणाऱ्या उत्पादनांवर अतिरिक्त आयातशुल्क (कर) अर्थात टॅरिफ लादणार आहे. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर दंड लावण्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली आहे.

भारत आमचा मित्र आहे, परंतु गेल्या काही वर्षांत आम्ही त्यांच्याशी तुलनेने कमी व्यापार केला आहे कारण ते खूप जास्त शुल्क लादतात. जगातील कोणत्याही देशापेक्षा भारतात सर्वात कठीण व्यापार अडथळे आहेत; असेही ट्रम्प यांनी ट्रूथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मतप्रदर्शन केले आहे.

Comments
Add Comment