इस्रायलच्या अडचणीत वाढ, फ्रान्ससह १४ देश पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता देण्याच्या तयारीत


गाझा : इस्रायल गाझामध्ये हमास विरोधात लढत आहे. ही लढाई सुरू असताना युरोपमधील देशांनी एक निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे इस्रायलच्या अडचणीत वाढ होणार आहे. इंग्लंड आणि फ्रान्स तसेच एंडोरा, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फिनलंड, आइसलंड, आयर्लंड, लक्झेम्बर्ग, माल्टा, न्यूझीलंड, सान मारिनो, पोर्तुगाल, नॉर्वे, स्लोव्हेनिया, स्पेन या देशांनी पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता देण्याची तयारी सुरू केली आहे.


इस्रायलने गाझामध्ये सुरू असलेली कारवाई थांबवली नाही तर संयुक्त राष्ट्रांच्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या महासभेत पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे संकेत आतापर्यंत १४ देशांनी दिले आहेत. फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सोशल मीडियात एक प्रसिद्धीपत्रक प्रदर्शित केले आहेत. यात १४ देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सही केलेले एक संयुक्त निवेदन आहे. या निवेदनाद्वारे १४ देशांनी पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता देण्याची तयारी सुरू केल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. हा इस्रायलसाठी मोठा धक्का समजला जात आहे.


आम्ही ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो. हमासने तातडीने सर्व अपहृतांना सोडून द्यावे. याचसोबत आम्ही इस्रायल आणि पॅलेस्टाईनला थेट चर्चा करुन प्रश्न सोडवण्याचे आवाहन करतो. वेस्ट बँक आणि गाझासह पॅलेस्टाईन या देशाला मान्यता द्यायला हवी असे आम्हाला वाटते; असे प्रसिद्धीपत्रक १४ देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या सह्यांनी काढण्यात आले आहे.


गाझा मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत आहे. यामुळे मानवी संकट निर्माण होत आहे. या प्रकरणात मानवाधिकार संघटनांनी लक्ष घालणे आवश्यक आहे. ही परिस्थती हाताळण्यासाठी संयुक्त राष्ट्रे ही संघटना समर्थ असल्याचे मत १४ देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केले आहे. इस्रायलसोबत आमचे चांगले संबंध आहेत आणि यापुढेही ते तसेच चांगले ठेवण्याची आमची इच्छा आहे. त्याचवेळी हे युद्ध थांबावे, असेही आम्हाला वाटते; असे मत १४ देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.


Comments
Add Comment

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन

इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिकेचा २५ टक्के आयातकर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाचे स्वयंघोषित कार्यकारी अध्यक्ष

वॉशिंग्टन  : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ

इराणमध्ये अस्थिरता कायम; आंदोलनातील मृतांचा आकडा पाचशे पार..

तेहरान : इराणमध्ये सुरू असलेली सरकारविरोधी आंदोलनं अद्यापही थांबलेली नसून, देशातील अनेक भागांमध्ये परिस्थिती

इराणच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यास अमेरिका तयार : ट्रम्प

वॉशिंग्टन : इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक

संयुक्त राष्ट्रे : रशियाने यूक्रेनवर केलेल्या नव्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील संघर्षाबाबत संयुक्त