Saturday, August 2, 2025

बांधणी आऊटफिट्सचा अनोखा खजाना!

बांधणी आऊटफिट्सचा अनोखा खजाना!

बांधणी साड्यांची फॅशन कधीही कमी होत नाही. आजही अनेक महिला त्यांच्या वॉर्डरोबमध्ये इतर साड्यांव्यतिरिक्त बांधणी साड्यासुद्धा आवर्जून ठेवतात. प्रत्येक स्त्रीकडे असणाऱ्या साड्यांच्या अनेक प्रकारामध्ये एक तरी बांधणी साडी असतेच. याच बांधणीच्या साडीपासून आपण वेगवेगळ्या पॅटर्नचे ट्रेंडी ड्रेस, कुर्ती, टॉप, शरारा, जंपसूट अगदी तुम्हाला जसे पाहिजे तसे आऊटफिट तुम्ही शिवू शकता. आता फेस्टिवल सीझन सुरू होतोय, पण काही मुली किंवा महिला केवळ विचारात असतात की, आपल्याला जुन्या बांधणी साडीचं काहीतरी शिवायचं तर आहे पण नक्की कोणता आऊटफिट शिवायचं हे लक्षात येत नाही. पण तुम्हाला माहितेय का, बांधणी साडी केवळ पारंपरिक नव्हे तर मॉडर्न टचसाठी देखील बांधणी पॅटर्नचा विचार केला जाऊ शकतो. बांधणी साडीचा लूक एक अनोखा अंदाज देतो. आज आम्ही तुम्हाला या लेखातून बांधणीपासून कसे आऊटफिट्स शिवता येतील त्याची माहिती सांगणार आहोत...




  • अनारकली
    लाल, गुलाबी, निळ्या रंगाच्या उठावदार बांधणीच्या साडीचा अनारकली ड्रेस अप्रतिम दिसतो. तुम्ही हा ड्रेस तुम्हाला हवा तितका घेरदार शिवू शकता.

  • लेहंगा
    लग्नसमारंभात तर तुम्ही हमखास एखादा गडद गुलाबी रंग किंवा निळ्या रंगाची बांधणी साडी घेऊन तुम्ही त्याचा घागरा आणि ब्लाउज शिवू शकता. असा लेहंगा अतिशय रॉयल लूक देतो.

  • जॅकेट
    बाहेर फिरायला जाताना किंवा बर्थडे पार्टीसाठी प्लेन गाऊनवर बांधणीचा घेरदार जॅकेट तुम्ही शिवू शकता. तुमचा लूक पार्टीवेअर दिसेल.

  • काफ्तान
    बांधणी साडीचा काफ्तान पॅटर्नचा हा ड्रेस देखील दिसायला फारच सुंदर दिसतो. आपण ऑफिस किंवा डेली वेअरसाठी असा काफ्तान पॅटर्नचा ड्रेस घालू शकता.

  • धोती पलाझो
    ट्रेडिशनल फेस्टिवलसाठी तुम्ही बांधणी साडीचा धोती स्टाईल प्लाझो आणि त्यावर तुम्हांला आवडेल अशा पॅटर्नचा एखादा शॉर्ट कुर्ता देखील शिवू शकता. बांधणीचा प्लाझो आणि कुर्ता आकर्षक लूक देईल.

  • जंपसूट
    आता बाजारात बांधणीचे वेगवेगळ्या डिझाइन्सचे जंपसूटसुद्धा पाहायला मिळतात. तुम्ही अशा प्रकारे बांधणी साडीचा ट्रेंडी जंपसूट देखील शिवून परिधान करू शकता.

  • शरारा
    बांधणीचा तुम्ही कोणत्याही फेस्टिवलसाठी शरारा नक्कीच शिवू शकता. शॉर्ट कुर्ती, शरारा आणि सोबत दुपट्टा एक अनोखा लूक देतो.

Comments
Add Comment