
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आजही अखेरच्या सत्रात घसरण होईल का हाच यक्षप्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे. पहाटे गिफ्ट निफ्टीत (०.१४%) घसरण झाली. सकाळी ९.३० वाजेपर्यंत गिफ्ट निफ्टी मात्र ०.०३% घसरण झाली. त्यामुळे आजही अस्थिरतेचा फटका कायम राहिल का हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे. सकाळच्या सत्रातील सुरुवातीला कलात सेन्सेक्स (Sensex) ४१.०० अंकाने व निफ्टी १२ अंकाने वाढला आहे. सेन्सेक्स सततच्या घसरणीनंतर बँक निर्देशांकात आजही घसरणीची शक्यता अधिक आहे. सुरूवातीच्या कलात सकाळी सेन्सेक्स बँक निर्देशांक १८४.०४ अंकाने व बँक निफ्टी ६८.२५ अंकांने घसरला आहे. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये मात्र अनुक्रमे ०.२१%,०.१४% वाढ झाली आहे. निफ्टी मिडकॅपमध्ये ०.०८% वाढ झाली असून स्मॉलकॅपमध्ये मात्र ०.०९% घसरण झाली आहे. आज सुरूवातीच्या कलात तरी वीआयएक्स अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) ०.७८% वाढला. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) मध्ये संमिश्र कौल मिळत आहे. सकाळ च्या सुरुवातीच्या कलात सर्वाधिक वाढ रिअल्टी (०.७६%) मेटल (०.५४%),ऑटो (०.१६%), हेल्थकेअर (०.२१%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण मिडस्मॉ ल फायनांशियल सर्व्हिसेस (०.२४%),आयटी (०.४१%),मिडिया (०.४१%), कंज्यूमर ड्युरेबल्स (०.१६%) समभागात झाली आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ गो डिजिट जनरल (६.०५%), टाटा केमिकल्स (४.८९%), वारी एनर्जी (४.८९%), जिंदाल स्टेन (३.७८%), लोढा डेव्हलपर (३.४७%), आरती इंडस्ट्रीज (२.९९%), टोरंट फार्मास्युटिकल (२.१०%), जेएसडब्लू स्टील (१.९५%), डीए लएफ (१.४२%), जियो फायनांशियल (१.६६%), इंडसइंड बँक (१.२९%), ओबेरॉय रिअल्टी (१.१७%), सीडीएसएल (१.१४%), एसईएमई सोलार होल्डिंग्स (१.०७%), श्रीराम फायनान्स (०.८२%), समभागात झाली आहे. सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण फाई व्ह स्टार बस फायनान्स (६.४६%), झेन टेक्नॉलॉजी (५.००%), माझगाव डॉक (४.५५%), होम फर्स्ट फायनान्स (३.५४%), आईएक्स (३.५३%), पुनावाला फायनान्स (३.०७%), पिरामल फार्मा (२.३४%), इटर्नल (१.७२%),भारत इलेक्ट्रॉनिक्स (१.२५%),सिमेन्स ए नर्जी इंडिया (०.७५%), इन्फोऐज (१.१९%), हिन्दुस्तान एरोनॉटिक्स (०.४२%), स्विगी (०.६३%), एसबीआय लाईफ इन्शुरन्स (०.७४%), टीसीएस (०.४९%), इन्फोसिस (०.६५%), एशियन पेटंस (०.२८%) समभागात झाली.
दुसरीकडे काल युएस टेरिफ वाढीच्या १ ऑगस्टपर्यंत होत असलेल्या अनिश्चिततेचा परिणाम झाल्याने आशियाई बाजारात कालही अस्थिरता कायम राहत संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. काल आशियाई बासजारातील बहुतांश बाजारात घसरण झाली होती ज्याम ध्ये निकेयी २२५ (०.८६%), स्ट्रेट टाईम्स (०.४६%), हेंगसेंग (१.०८%), सेट कंपोझिट (०.०९%), शांघाई कंपोझिट (०.०८%), तैवान वेटेड (०.८४%) बाजारात घसरण झाली होती. केवळ कोसपी (०.४९%) जकार्ता कंपोझिट (०.१६%) बाजारात वाढ झाली. युरोपि यन बाजारातील तिन्ही बाजारात घसरण कायम होती. ज्यामध्ये तिन्ही एफटीएसई (०.४३%), सीएससी (०.४३%), डीएएक्स (१.०३%) बाजारांचा समावेश आहे. टेरिफ १५% निश्चिती झाली असली तरी काही वस्तूंवर टेरिफ ५०% पर्यंत नेल्याने बाजारात नाखुशीचे वातावरण होते.
युएस बाजारातील तिन्ही बाजारात मात्र वाढ झाली होती. डाऊ जोन्स (०.११%), एस अँड पी ५०० (०.०२%), नासडाक (०.३३%) बाजारात वाढ झाली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियनशी १५% टेरिफ करार केला आहे. यापूर्वी ५०% मग ३०% व भौगोलि क दृष्ट्या युरोपियन खंड व्यापारासाठी महत्वाचा असल्याने वाटाघाटीतून १५% करार निश्चित करण्यात आला. दुसरीकडे आज सकाळी रशियन कच्च्या तेलाच्या अनिश्चितेमुळे कच्च्या तेलाच्या निर्देशांकातही वाढ झाली होती. सलग तीन दिवस कच्चे तेल स्थिर अस ले तरी आज ही वाढ झाली होती. ओपेक (OPEC) कडून तेलाच्या उत्पादनात वाढ झाली असली तरी वाढत्या स्पॉट मधील मागणी (बोलीत) वाढ झाल्याने ही वाढ झाल्याचे तज्ञांनी म्हटले होते. काल सोन्याच्या जागतिक निर्देशांकात वाढ झाली असली तरी भारतात सोन्याच्या किंमतीत विशेष बदल झाला नव्हता. त्यामुळे दर ' जैसे थे' होते. प्रामुख्याने घटत्या मागणीमुळे दर स्थिर राहण्यास मदत झाली होती. आजही सकाळी सोन्याच्या निर्देशांकात किरकोळ घसरण झाली आहे. आजही बाजारातील स्थिती पाहता आगामी तिमा ही निकालावरील परिणाम बाजारातील दिशा निश्चित करू शकतात मात्र त्यासोबत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची घसरलेल्या गुंतवणूकीचा कित्ता आजही गिरवला जाईल का यातून निर्देशांकातील कामगिरी स्पष्ट होईल.
आजच्या सकाळच्या सत्रातील परिस्थितीवर विश्लेषण करताना चॉईस इक्विटी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेडचे डेरिएटिव विश्लेषक मंदार भोजने म्हणाले की,' २९ जुलै रोजी बेंचमार्क सेन्सेक्स,निफ्टी निर्देशांक नकारात्मक पातळीवर उघडतील अशी अपे क्षा आहे कारण GIFT निफ्टी ट्रेंडने व्यापक निर्देशांकासाठी ४६ अंकांची घसरण दर्शविली आहे. नकारात्मक सुरुवातीनंतर, निफ्टी २४६०० पातळीवर आधार मिळवू शकतो, त्यानंतर २४५०० आणि २४३०० पातळीवर. वरच्या बाजूला, २४८०० हा तात्काळ प्रतिका र असू शकतो, त्यानंतर २४९०० आणि २५००० पातळीवर. बँक निफ्टीच्या चार्टवरून असे दिसून येते की त्याला ५६००० पातळीवर आधार मिळू शकतो, त्यानंतर ५५८०० आणि ५५५०० पातळीवर आधार मिळू शकतो. जर निर्देशांक पुढे सरकला तर ५६४०० हा प्रारंभिक प्रमुख प्रतिकार असेल त्यानंतर ५६७०० आणि ५७००० पातळीवर. २८ जुलै रोजी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ६,०८२ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (डीआयआय) ६,७६४ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.काल इंडियाव्हीएक्स सकारात्मक होता, तो ६.९८% ने वाढला आणि सध्या १२.०६२५ वर व्यवहार करत आहे.
काल भारतीय शेअर बाजार स्थिर स्थितीत उघडले परंतु त्यांचे सुरुवातीचे स्तर राखण्यात अपयशी ठरले, कारण सत्रादरम्यान विक्रीचा दबाव वाढला. यामुळे निफ्टी कमी झाला आणि निर्देशांक दिवसाच्या शेवटी नकारात्मक पातळीवर २४,७०० च्या खाली बंद झा ला. दैनिक चार्टवर, निफ्टीने मंदीची मेणबत्ती (Bearish Candle) तयार केली, ज्यामध्ये वरची लक्षणीय विक होती, जी उच्च पातळीवर विक्रीचा दबाव आणि खरेदीचा विश्वास कमी असल्याचे दर्शवते.जागतिक संकेत मिश्रित राहिले ज्यामुळे सावधगिरीचा सूर वाढ ला. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफआयआय) यांनी त्यांची विक्रीची मालिका सुरू ठेवली, जी व्यापक बाजाराच्या भावनेवर सतत दबाव असल्याचे दर्शवते. तांत्रिक दृष्टिकोनातून, निफ्टीसाठी तात्काळ आधार २४,६००-२४,५०० च्या श्रेणीत ठेवला आहे. याझो नच्या खाली ब्रेकडाउनमुळे आणखी घसरण होऊ शकते, पुढील समर्थन पातळी २४३०० आणि २४२०० पातळीवर दिसून येईल. वरच्या बाजूला, २४८००-२५००० पातळी झोनमध्ये प्रतिकार दिसून येईल. चालू विक्रीच्या दबावात कोणत्याही अर्थपूर्ण विरामासाठी २ ५००० पातळीवर सतत हालचाल करणे महत्त्वाचे आहे. जोपर्यंत निर्देशांक २५००० पातळीच्या खाली व्यापार करत आहे, तोपर्यंत अल्पकालीन दृष्टीकोन कमकुवत राहतो आणि 'विक्री-वर-वाढ' (Sell on Rise) धोरणाचा सल्ला दिला जातो. व्यापाऱ्यांनी सावध रा हावे आणि वाढत्या इंट्राडे अस्थिरतेमध्ये सक्रियपणे जोखीम व्यवस्थापित करावी.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले की,' बाजारपेठेत सध्याच्या घडामोडींपेक्षा जास्त प्रतिकूल परिस्थिती आहेत. बाजारांवर दबाव अस लेला प्रमुख मु द्दा म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यातील अपेक्षित व्यापार करार अद्याप झालेला नाही आणि १ ऑगस्टच्या अंतिम मुदतीपूर्वी करार होण्याची शक्यता कमी होत चालली आहे. जपान आणि युरोपियन युनियनशी करार करण्यात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे यश, जे अमे रिकेसाठी फायदेशीर होते, त्यामुळे भारतासोबतच्या करारावर अमेरिकेची भूमिका आणखी कठीण होऊ शकते. १ ऑगस्टच्या अंतिम मुदतीपूर्वी काय होते हे पाहणे बाकी आहे. याशिवाय, जर रशियाने युक्रेनशी युद्ध थांबवण्याबाबत करार केला नाही तर रशिया सोबत व्यापार करणाऱ्या देशांवर अधिक शुल्क लादण्याचे धोके आहेत.औषधांवरील शुल्काचा धोका ही आणखी एक चिंता आहे. आतापर्यंतच्या करारांमध्ये रक्ताची चव चाखलेले अध्यक्ष ट्रम्प पुढे जाऊन कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. ही चिं तेची बाब आहे. घरगुती गुंतवणूकदार (DII) खरेदी असूनही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) यांची सतत विक्री बाजारावर परिणाम करत आहे. वाट पाहा आणि पहाण्याच्या ( Wait and Watch) स्थितीत राहणे चांगले.'
आजच्या सुरुवातीच्या निफ्टीतील कलावर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनितीकार आनंद जेम्स म्हणाले की,' निफ्टी ५०० घटकांपैकी ६५% दिवसाच्या नीचांकाच्या १% च्या आत बंद होत असल्याने आणि त्यापैकी ३ ०% सरासरीपेक्षा दोन मानक (Standards) विचलनांपेक्षा जास्त बंद होत असल्याने, ब्रॉड मार्केट कदाचित पीक फियरच्या जवळ येत आहे. २४९२२ पातळीने वरच्या दिशेने झाकण ठेवले असले तरी, २४७५०-६५० क्षेत्राने (Zone) अपेक्षित रेषांवर अनेक नकारा त्मक हल्ले सहन केले. आम्हाला खात्री नाही की हा प्रदेश आणखी एक दिवस टिकेल की नाही, परंतु पसंतीचा दृष्टिकोन २४४५० किंवा २४००० पातळीपर्यंत न वाढता वरच्या दिशेने वळण्याची अपेक्षा करतो, जे प्रमुख समर्थन आहेत. दरम्यान, २४७८८ पातळीवर च्या दिशेने जाईल, २४९२२- २ ५०५० हे प्रमुख प्रतिकार (Resistance) असतील.'