सरपंच, उपसरपंचांचे मानधन झाले दुप्पट

मुंबई : राज्यातील हजारो ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत सरपंच आणि उपसरपंचांसाठी मोठी दिलासादायक बातमी! सरपंच परिषदेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन आता जुलै २०२४ पासून दुप्पटीने थेट खात्यात जमा होऊ लागले असल्याचे सरपंच परिषदेचे राज्य अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी सांगितले.


२०१७ च्या शासन निर्णयानुसार दिले जाणारे मानधन अद्यापही सुरू असल्याने सरपंच परिषद, पुणे कडून मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे २०२४ च्या नवीन शासन निर्णयानुसार दुप्पट मानधन आणि सदस्य भत्ता मिळावा, अशी जोरदार मागणी केली होती.


या मागणीची तत्काळ दखल घेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अंमलबजावणी सुरू केली असून जुलै महिन्यापासून राज्यभर सरपंच, उपसरपंचांना वाढीव मानधन मिळू लागले आहे.उदगीर येथे पार पडलेल्या बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरपंच परिषदेकडून करण्यात आलेली दुप्पट मानधनाची मागणी मान्य केली होती. त्यानंतर मंत्रीमंडळ बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करून शासन निर्णय घेतला होता.


गावपातळीवर रास्त व न्याय काम करताना होणारी फरफट पाहता त्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्यामुळे जिल्हयातील ग्रामपंचायतीं मध्ये आनंदाचे वातावरण आहे.



मंत्री जयकुमार गोरे यांचा करणार जाहीर सत्कार!


या निर्णयाबद्दल सरपंच परिषदेकडून मंत्री जयकुमार गोरे यांचा राज्यातील सरपंच एकत्र येऊन ऐतिहासिक सत्कार साताऱ्यात करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच परिषद पुणेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले आणि महिला प्रदेशाध्यक्षा झीनत सय्यद यांनी दिली.

Comments
Add Comment

'ठाकरें'ना दसऱ्यालाच मोठा झटका! ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के, कोकणातील नेता शिंदे गटात दाखल

दसऱ्यादिवशीच मेळाव्यातच केला प्रवेश; कोकणातील माजी आमदार राजन तेली यांचा प्रवेश मुंबई: शिवसेना (उद्धव

जरांगेच्या डोक्यात शिजतंय काय? मराठ्यांपाठोपाठ आता शेतक-यांचा मसिहा बनणार, बघा कोणत्या केल्या मागण्या

मनोज जरांगेंची सरकारकडे ८ मोठ्या मागण्यांची यादी, शेतकऱ्याला दरमहा १०,००० पगार ते संपूर्ण कर्जमाफी जरांगेंचा

'असे हलके वागणारे माझे नाहीत!' गोंधळ घालणाऱ्या समर्थकांवर पंकजा मुंडे कडाडल्या

भगवान गडाचा वारसा हिरावून घेणाऱ्यांवर पंकजा मुंडेंचा हल्लाबोल बीड:

'जातीपातीचे राक्षस' संपवा! दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं आक्रमक आणि भावनिक आवाहन

'मी गोपीनाथ मुंडेंची बेटी आहे,' म्हणत पंकजा मुंडेंनी जागवल्या आठवणी जा

RSS : कोण शत्रू, कोण मित्र ? हे पहलगामच्या घटनेने शिकवले'

नागपूर : ऐतिहासिक रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव झाला. या उत्सवात बोलताना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, माजी राष्ट्रपतींची उपस्थिती

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने यंदा नागपूरमध्ये भव्य विजयादशमी