Nimisha Priya : येमेनमध्ये केरळच्या नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द, भारताचा मोठा विजय

नवी दिल्ली: येमेनमध्ये एका येमेनी नागरिकाची हत्या केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या केरळच्या नर्स निमिषा प्रिया हिला मोठा दिलासा मिळाला आहे. येमेनच्या ग्रँड मुफ्ती कार्यालयाने निमीषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द केल्याची पुष्टी केली आहे. हा भारतासाठी एक मोठा राजनैतिक विजय मानला जात आहे, कारण भारत सरकार निमीषाला वाचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते.


एएनआयच्या माहितीनुसार, ग्रँड मुफ्तीच्या कार्यालयाने सांगितले की यमनची राजधानी सना मधील उच्चस्तरीय बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, येमेन सरकारने अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

२०१७ पासून येमेनच्या तुरुंगात आहे निमिषा प्रिया


येमेन न्यायालयाने निमिषा प्रियाला एका खून प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. ती २०१७ पासून येमेनच्या तुरुंगात आहे. केरळमधील पलक्कड येथील नर्स निमिषा गेल्या दशकापासून तिच्या पती आणि मुलीसह येमेनमध्ये कामानिमित्त राहत होती. २०१६ मध्ये येमेनमध्ये झालेल्या गृहयुद्धामुळे देशाबाहेर प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली होती. परंतु त्यापूर्वीच, २०१४ मध्ये तिचा पती आणि मुलगी भारतात परतले होते. मात्र निमिषा परत येऊ शकली नाही.



काय आहे नेमकं प्रकरण?


येमेनच्या कायद्यानुसार परदेशी नागरिकांना क्लिनिक सुरू करण्यासाठी स्थानिक पार्टनर असणं बंधनकारक होतं. म्हणूनच निमिषाने तलाल अब्दो महदी या येमेनी नागरिकाला पार्टनर केलं. पण काही महिन्यांनी दोघांमध्ये वाद सुरू झाले आणि तलालने तिच्यावर दबाव आणायला सुरुवात केली. तिचा पासपोर्ट काढून घेतला आणि धमक्या द्यायला लागला. त्यामुळे निमिषाने पोलिसात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली, त्यानंतर तलालला अटकही झाली. पण तो सुटला आणि तिला पुन्हा त्रास द्यायला लागला. या सगळ्या त्रासाला कंटाळून, २०१६ मध्ये निमिषाने तलालला गुंगीचे इंजेक्शन देऊन त्याच्याकडून पासपोर्ट मिळवण्याचा प्रयत्न केला. पण औषधाची मात्रा जास्त झाली आणि यात तलालचा मृत्यू झाला. घाबरून निमिषा आणि तिच्या एका साथीदाराने तलालचा मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनी पोलिसांनी दोघांना पकडलं. निमिषावर खुनाचा गुन्हा दाखल झाला. २०१८ मध्ये तिच्यावर गुन्हा सिद्ध होऊन, येमेनच्या न्यायालयाने तिला फाशीची शिक्षा सुनावली. निमिषाने या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात अपील केलं, पण तिथेही निकाल तिच्या विरोधात लागला.

Comments
Add Comment

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात