Saturday, August 2, 2025

Amit Shah : पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान; अमित शाह यांची लोकसभेत माहिती

Amit Shah : पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान; अमित शाह यांची लोकसभेत माहिती

“ऑपरेशन महादेव राबवून पहलगाम हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा"


नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या ३ दहशतवाद्यांना ऑपरेशन महादेवमध्ये ठार करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज लोकसभेत याबाबत माहिती दिली. पहलगामचा हल्ला अत्यंत भयंकर आणि भीषण होता. त्यावर चर्चा होते आहे, ती झालीही पाहिजे. ऑपरेशन सिंदूरच्या आधी मी ऑपरेशन महादेव याची माहिती देतो आहे. सुलेमान, अफगाण आणि जिब्रान हे तीन दहशतवादी सेना, सीआरएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मारले गेले. सुलेमान हा लष्कर ए तोयबाचा कमांडर होता. पहलगाम हल्ला आणि गगनीर हल्ल्यात त्याचा सहभाग होता. अफगाण लष्कर ए तोयबाचा अतिरेकी होता. जिब्रानही याच प्रकारतला दहशतवादी होता. मी आज सदनाला हे सांगतो आहे की ज्यांनी बैसरनच्या खोऱ्यात आपल्या नागरिकांवर हल्ला केला त्यात हे तिन्ही दहशतवादी होते. पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या तीनही दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचं अमित शहा यांनी सांगितले.


गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, पहलगाममध्ये पर्यटकांना मारणारे तिन्ही दहशतवादी मारण्यात आले. जम्मू काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि सैन्याने ही कारवाई केली. दहशतवाद्यांकडून तीन रायफल जप्त करण्यात आल्या. सुलेमान, जिब्रान आणि अफझल हे दहशतवादी मारले गेले. पहलगाममध्ये ज्या रायफलने हल्ला करण्यात आला होता, त्याही दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अमित शाह यांनी दिली.




लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलीस यांचं धन्यवाद


CRF, लष्कराचे जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस यांचं मी लोकसभेतल्या सगळ्या सदस्यांतर्फे धन्यवाद करतो. ऑपरेशन महादेवची सुरुवात २२ मे २०२५ ला झाली. दुपारी १ वाजता पहलगामचा हल्ला झाला, त्यानंतर त्याच दिवशी म्हणजेच २२ एप्रिलला मी संध्याकाळी ५:३० पहलगामला भेट दिली.




दहशतवाद्यांची ओळख पटवली


पहलगामध्ये हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानमधून आले होते, याचा पुरावा काय? असा प्रश्न सोमवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. महत्त्वाचे म्हणजे आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही चिदंबरम यांना प्रत्युत्तर दिलं आहे. अमित शहा म्हणाले, याच ३ दहशदवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला होता. आता दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली आहे. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोन आरोपींनीही त्यांची ओळख पटवली आहे. आज (२९ जुलै) पहाटे ४ वाजता दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोन जणांना देखील अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानातील मतदार ओखळपत्र सरकारकडे आहे. तसेच त्यांनी वापरलेली बंदुके आणि त्यांच्याकडे आढळेली च़ॉकलेटसुद्धा पाकिस्तानातील आहे. यावरून हे स्पष्ट होतं, की हे अतिरेकी पाकिस्तानातून आले.



कसं राबवलं ऑपरेशन महादेव ?


आम्ही २३ एप्रिलला एक बैठक घेतली. जम्मू काश्मीर पोलीस, लष्कर, CRPF यांची ही संयुक्त बैठक होती. यामध्ये आम्ही पहिला निर्णय केला की देशावर दहशतवादी हल्ला करणाऱ्या एकाही दहशतवाद्याला पाकिस्तानात पळून जाऊ द्यायचं नाही आणि आपण कुणालाही पळून जाऊ दिलं नाही त्यांना ठार केलं. २२ मे रोजी IB ला एक महत्त्वाची माहिती मिळाली. एका गावात दहशतवादी उपस्थित असल्याचं त्यांना कळलं. त्यानंतर २२ मे ते २२ जुलै या दहशतवाद्यांचे सिग्नल आपण तपासले. २२ जुलैला आपल्याला मोठं यश मिळालं कारण सेन्सॉरच्या माध्यमातून हे दहशतवादीच असल्याचं समजलं. त्यानंतर ४ पॅराचे जवान, लष्कराचे जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस यांनी संयुक्त कारवाई सुरु केली. तीन दहशतवाद्यांचा सोमवारी आपण खात्मा केला. दहशतवाद्यांची रितसर ओळख पटवण्यात आली. कारण एनआयएने या दहशतवाद्यांना जेवण पोहचवणाऱ्या लोकांना ताब्यात घेतलं होतं. ४ जणांनी ओळख पटवली की ज्या तिघांचा खात्मा केला तेच दहशतवादी होते ज्यांनी पहलगाम हल्ला केला असंही अमित शाह म्हणाले.

Comments
Add Comment