Saturday, August 2, 2025

गजवा-ए-हिंद करू इच्छिणाऱ्यांना नितेश राणेंचा इशारा! मराठीच्या मुद्द्यावर म्हणाले, 'आम्ही विटेचे उत्तर दगडाने देऊ'

गजवा-ए-हिंद करू इच्छिणाऱ्यांना नितेश राणेंचा इशारा! मराठीच्या मुद्द्यावर म्हणाले, 'आम्ही विटेचे उत्तर दगडाने देऊ'

ओडिशा: भुवनेश्वरमधील 'सुशासन संवाद'मध्ये मंत्री नितेश राणे यांनी हिंदुत्व, मराठी अस्मिता, लव्ह जिहाद आणि गझवा-ए-हिंद या विषयांवर आपले स्पष्ट मत मांडले.


ओडिशा येथील भुवनेश्वरमध्ये ताज विवांता येथे आयोजित करण्यात आलेल्या 'ओडिशा की उडान' या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी, ओडिशाच्या उपमुख्यमंत्री प्रभातीजी परिडा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक मुकुलजी कानिटकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक जे.नंदकुमार,उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक डॉ.विक्रम सिंह देखील उपस्थित होते. यादरम्यान मंत्री नितेश राणे यांनी अनेक विषयांवर आपले रोखठोक मत मांडले.  काय म्हणाले नितेश राणे? सविस्तर जाणून घेऊया.



महाराष्ट्रात मराठीत यावे त्यात काहीही गैर नाही, पण...


महाराष्ट्रात मराठी अस्मितेच्या विषयावरून चाललेल्या राजकारणाबद्दल आपले मत व्यक्त करतात. ते म्हणतात, "जर तुम्ही महाराष्ट्रात आहात तर तुम्हाला मराठी यायला हवे, आणि त्यात काहीही गैर नाही. पण जर तुम्ही हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्या नावाखाली फक्त हिंदूंना लक्ष्य केले तर आमचे महाराष्ट्र सरकार किंवा आमच्यासारखे हिंदुत्वनिष्ठ ते सहन करणार नाहीत. विटेचे उत्तर दगडाने कसे द्यायचे हे आम्हाला चांगलेच माहिती आहे."


ते पुढे असे देखील म्हणाले की, जर तुमच्यात मराठीची ताकद दाखवण्याची हिंमत असेल, तर तुम्ही मुस्लिम वस्तीत जाऊन तिथे मराठी शिकायला हवी असे का म्हणत नाही? उद्याची अजान मराठीत का बोलायला सांगत नाही? जर तुम्हाला तुमचे सर्व शौर्य फक्त हिंदूंवर दाखवायचे असेल आणि नंतर मुस्लिम वस्तीत जाऊन मांजरीसारखे फिरायचे असेल तर हे चालणार नाही. सत्तेत येण्यासाठी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे एक मोठे षड्यंत्र असल्याचा दावा त्यांनी केला आहे.



हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वंदनीय


मंत्री नितेश राणे दिवंगत हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आपले वंदनीय मानतात. मराठी माणसांच्या राजकारणाचा जेव्हा विषय येतो तेव्हा त्यांचे नाव आवर्जून येते. याबद्दल बोलताना नितेश राणे यांनी सांगितले की, जर तुम्ही बाळासाहेब ठाकरेजींबद्दल बोलत असाल तर त्यांचा मुद्दा वेगळा आहे. ठाकरे ब्रँड हिंदुत्व आणि हिंदू सणांमुळे वाढला. पण, जेव्हा त्यांनी स्वतःला हिंदुत्वापासून दूर केले तेव्हा प्रश्न उपस्थित होऊ लागले. तुम्ही ज्या दोन भावांबद्दल बोलत आहात, काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या, जनतेने एकाला फक्त २० आमदार दिले आणि दुसऱ्याला शून्य. यावरून महाराष्ट्रातील लोकांच्या मनात काय आहे ते स्पष्ट होते.



ठाकरे बंधूंवर टीका


मराठीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापवू इच्छित असणाऱ्या ठाकरे बंधूवर त्यांनी टीका केली. ते म्हणाले, "जर ते (ठाकरे बंधू) मराठी माणसांचा आवाज ऐकतात, तर आमचा आवाज कुठून येतोय? मराठी माणसांनीही आम्हाला मतदान केले आहे. त्यांच्या मतांमुळेच मी आमदार आणि नंतर मंत्री झालो आहे. आज आपले राज्य सरकार प्रचंड बहुमताने सत्तेत आहे आणि हे हिंदूंच्या मतदानामुळे शक्य झाले आहे. मी अभिमानाने सांगतो की जर मी येथे आमदार आणि मंत्री म्हणून बसलो आहे तर ते फक्त महाराष्ट्रातील हिंदूंमुळेच आहे. मी इतर कोणत्याही परिसरात मते मागण्यासाठी गेलो नाही. आमचा दृष्टिकोन स्पष्ट आहे - हिंदुत्वाची एकता ही आमची सर्वात मोठी ताकद आहे.



गजवा-ए-हिंद आणि घुसखोरीचा मुद्दा


सीमावर्ती राज्यांमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या बेकायदेशीरपणे वेगाने पसरत आहेत. महाराष्ट्रामध्येही या लोकांची संख्या वाढत चालली आहे, त्यावर उपाय शोधण्यासाठी मंत्री नितेश राणे यांनी आपला दृष्टिकोन स्पष्ट केला. ते म्हणाले, "ही समस्या सर्वत्र आहे. त्यांचे ध्येय २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवणे आहे. हे लोक कधी लव्ह जिहाद, कधी लँड जिहाद, कधी बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरी द्वारे आपले हातपाय पसरत आहेत. सुरुवातीला ते मित्र म्हणून पुढे येतात, छोटी-छोटी कामे करू लागतात आणि नंतर हळूहळू बॉस बनतात. त्यांचे ध्येय सर्वत्र त्यांची हिरवी चादर पसरवणे आहे.



आर्थिक बहिष्कार खूप महत्त्वाचा


आजकाल ते त्यांची नावे बदलून काम करायला सुरुवात करतात. उदाहरणार्थ, मंदिराबाहेर एक फुलांचे दुकान असेल, दुकानाचे नाव जय श्री राम फुलवाला असेल, पण आत अब्दुल बसलेला असेल. अशा लोकांना त्यांचे आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र दाखवण्यास सांगितले पाहिजे. जर ते दाखवले नाहीत तर त्यांच्याकडून खरेदी करू नये. कारण हे पैसे जिहादसाठी वापरले जातात. म्हणून, खरेदी फक्त हिंदूंकडूनच करावी असा निर्णय घ्यावा लागेल. आर्थिक बहिष्कार खूप महत्त्वाचा आहे. जर आपण हा निर्णय घेतला तर हे घुसखोर बांगलादेश किंवा पाकिस्तानात परत जातील.


 

 
Comments
Add Comment