Saturday, August 2, 2025

राज्यात २५ हजार प्राथमिक शिक्षक अतिरिक्त ठरणार

राज्यात २५ हजार प्राथमिक शिक्षक अतिरिक्त ठरणार

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद शाळा मधील तब्बल २५ हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे. राज्य शासनाने शाळांमधील संच मान्यता करण्यासाठी सुधारित शासन निर्णय १५ मार्च २०२४ रोजी निर्गमित केला होता त्याचा हा परिणाम असल्यास सांगण्यात येत आहे.


छत्रपती संभाजीनगर आदर्श शिक्षक समितीचे संस्थापक अध्यक्ष दिलीप ढाकणे यांनी ही माहिती दिली. त्यांच्या मते, एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच ५१५ शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे.



पूर्वीच्या संच मान्यतेनुसार, २० पटसंखेच्या शाळेत एकच शिक्षक आणि एक सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करण्याची तरतूद होती. तसेच पूर्वी पहिली ते पाचवीच्या वर्गात ६१ विद्यार्थी असतील तर तीन शिक्षकांची तरतूद होती. मात्र, नव्या नियमात हा आकडा ७६ वर्गाला आहे. याच वेळी चौथा शिक्षक पूर्वी ९१ पट संख्येला देण्यात येत होता. आता १०६ वर पोहोचला आहे. नव्या नियमांनुसार, आता ७६ विद्यार्थ्यांना तीन शिक्षक आणि ९१ ऐवजी १०६ विद्यार्थ्यांना चौथा शिक्षक दिला जाणार आहे.या बदलांमुळे जिल्ह्यातील अनेक शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरतील, असे ढाकणे यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा