Saturday, August 2, 2025

चिचोंडी पाटील ५१ गुंठे जमीन प्रकरणात १२ वर्षांनी न्याय: सरोदे कुटुंबाची न्यायालयात विजयाची नोंद

चिचोंडी पाटील ५१ गुंठे जमीन प्रकरणात १२ वर्षांनी न्याय: सरोदे कुटुंबाची न्यायालयात विजयाची नोंद

उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते मिळाला सातबारा


मुंबई : अहिल्यानगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील कौसाबाई मारुती सरोदे यांच्या ५१ गुंठे जमिनीच्या बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणात तब्बल १२ वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. अनेक वर्षे तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय व प्रांत कार्यालयांचे उंबरठे झिजवूनही न्याय न मिळाल्याने, मागील महिन्यात सरोदे कुटुंब आणि ग्रामपंचायत सरपंच शरद पवार यांनी त्यांच्या घराचा संसार, शेळ्या-मेंढ्या घेऊन तहसील कार्यालयात ९ दिवसांचे बेमुदत आंदोलन सुरू केले होते.


सदर प्रकरणाची माहिती युवानेते पांडुरंगजी दातीर यांनी उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे व महसूल राज्यमंत्री मा. श्री. योगेशदादा कदम यांना दिली. त्यानंतर मा. योगेश कदम यांनी तात्काळ जिल्हाधिकारी आणि तहसीलदार, अहिल्यानगर यांच्याशी संपर्क साधून त्वरित कारवाईचे आदेश दिले. या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या तत्परतेमुळे तहसीलदारांनी सरोदे कुटुंबाच्या नावावर जमिनीचा फेरफार आदेश जारी केला. यानंतर सरोदे कुटुंबाने आपले उपोषण थांबवले.



आज मंत्रालयात कौसाबाई सरोदे व त्यांच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांची व गृहराज्यमंत्री मा.श्री. योगेश कदम यांची भेट घेऊन घोंगडी, पिवळा फेटा व भंडारा देऊन सन्मान केला. यावेळी सरपंच शरद पवार, सूर्यभान सरोदे, चंद्रकांत पवार, अभिषेक कदम, युवराज हजारे, किरण मोरे हे उपस्थित होते. “जेव्हा प्रशासन सजग असतं आणि नेतृत्व जनतेप्रती संवेदनशील असतं, तेव्हा कितीही जुना अन्याय असो, शेवटी न्याय मिळवून देणे शक्य होतं.” ही घटना राज्यशासनाच्या तत्परतेचे आणि उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब व मा. मंत्री श्री. योगेश कदम यांच्या जनहितकारी नेतृत्वाचे जिवंत उदाहरण ठरली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा