मोहित सोमण:आज आठवड्याची सुरुवात घसरणीनेच कायम आहे. घसरणीचे सत्र सकाळच्या सत्रात बाजाराने कायम राखले आहे. अस्थिरता निर्देशांक (VIX) ४.१०% उसळल्याने आजही अस्थिरतेचा धोका बाजारात स्पष्टपणे जाणवत आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ६६.८९ अंकांने घसरला असून निफ्टी निर्देशांकात 'सपाट' (Flat) प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे निफ्टी ४.५० अंकाने घसरला. प्रामुख्याने १ ऑगस्टपर्यंत अतिरिक्त टेरिफपासून सवलतीचा अखेरचा दिवस आहे. परंतु यावर युएस प्रशासनाकडून तारखेव रून वेगवेगळी विधाने येत असल्याने बाजारातील अनिश्चितता कायम राहिली आहे. याशिवाय शेअर एक्सपायरी जवळ आल्याचा परिणामही बाजारात दिसून आला आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स बँक निर्देशांकात मात्र जबरदस्त घसरण कायम आहे. सेन्सेक्स बँ क निर्देशांकात ५०१.४५ अंकांची घसरण झाली असून बँक निफ्टीतही ८१.७५ अंकांची घसरण कायम आहे. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.४४%,०.२२% वाढ झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.४९%,०.३०% वाढ झाली आ हे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices). मध्ये बहुतांश समभागात वाढ झाल्याने बाजारातील घसरणीवर अंकुश लागण्यास मदत झाली असून मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये झालेल्या वाढीमुळे बाजाराला सपोर्ट लेवल प्राप्त झाली आहे.
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ ऑटो (०.६३%), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (०.९०%), तेल व गॅस (०.६९%) या समभागात झाली. सर्वाधिक घसरण रियल्टी (२.७४%), आयटी (०.५४%), खाजगी बँक (०.९७%) समभागात झाली. काल युएसकडून ईयु वर (युरोपियन युनियन EU) १५% टेरिफ जाहीर करण्यात आल्याने गुंतवणूक नक्की काय प्रतिसाद देतील ते अखेरच्या सत्रात स्पष्ट होईल तत्पूर्वी सातत्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आपल्या काढत्या गुंतवणूकीमुळे बाजारातील निर्देशांकात सातत्याने घस रण होत आहे. याशिवाय नुकतेच जाहीर झालेल्या बहुतांश तिमाही निकालात अपेक्षित यश न मिळाल्यानेही घसरण कायम आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकाशिवाय यापुढेही तिमाही निकालांचा परिणाम आगामी काळात जाणवू शकतो. फेडच्या आगामी निर्णयाकडे गुंतवणूकदार बारकाईने लक्ष ठेवून आहेत. रूपयातील घसरण, डॉलर निर्देशांकात ०.१% वाढ कायम राहिल्याने ही घसरण होत आहे. यामुळे एकूणच बाजारातील परिस्थिती पाहता आज गुंतवणूकदारांना सपाट स्थितीत कल पहायला मिळण्याची शक्यता नाकार ता येत नाही.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ आधार हाउसिंग फायनान्स (७.३४%), एसईएमई सोलार होल्डिंग्स (६.२६%), आरबीएल बँक (३.३१%), वन ९७ (२.६५%), श्रीराम फायनान्स (२.१४%), अदानी ग्रीन एनर्जी (१.७४%), कॅनरा बँक (१.५२%), बीएसई (१.७५%), बजाज फिनसर्व्ह (१.५३%), मदर्सन (१.३९%), एसबीआय लाईफ इन्शुरन्स (१.०३%), अदानी एंटरप्राईजेस (१.२७%), टाटा पॉवर (०.८१%) समभागात झाली.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण इंडियन एनर्जी एक्सचेंज (७.०१%), लोढा डेव्हलपर (६.१४%),कोटक महिंद्रा बँक (६.४८%), लोढा डेव्हलपर (५.९०%), टीसीएस (१.४१%), हिंदाल्को (०.५१%), होम फर्स्ट फायनान्स (५.७५%), झेन टेक्नॉलॉजी (५.००%), एसबीआय कार्ड (३.०६%), सीडीएसएल (३.००%), सेल (२.५४%), एमसीएक्स (१.८०%), होंडाई मोटर्स (०.८३%) समभागात झाली.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर निरीक्षण नोंदवताना चॉईस इक्विटी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेडचे वरिष्ठ तंत्रज्ञान व डेरिएटिव विश्लेषक मंदार भोजने म्हणाले की,'भारतीय बेंचमार्क निर्देशांक आज सपाट ते नकारात्मक पातळीवर उघडण्याची श क्यता आहे असे गिफ्ट निफ्टीने दर्शविले आहे, जे निफ्टी ५० मध्ये सुमारे १५ अंकांची किरकोळ घसरण दर्शवते. वाढत्या अस्थिरता आणि मिश्र जागतिक संकेतांमध्ये बाजारातील भावना सावधपणे आशावादी राहिल्या आहेत. शुक्रवारी निफ्टी ५० निर्देशांकाने त्याची घसरण वाढव ली, २४९०० पातळीच्या तात्काळ समर्थन (Immediate Support Zone) पातळीच्या खाली घसरली आणि २४८३७ पातळीवर स्थिरावली. घसरण मुख्यत्वे कमकुवत जागतिक संकेतांमुळे आणि निराशाजनक कॉर्पोरेट कमाईमुळे झाली. कोणत्या ही अर्थपूर्ण वाढीची पुनरावृत्ती होण्यासाठी, निर्देशांकाला २५१५० पातळीच्या वर निर्णायकपणे बंद करावे लागेल. या पातळीपेक्षा जास्त ब्रेकआउट येत्या सत्रांमध्ये २५५०० आणि २५७०० पातळीच्या आसपास उच्च लक्ष्यांसाठी दार उघडू शकते. तोपर्यंत, व्यापक दृ ष्टिकोन मंदी च्या दिशेने बाजूलाच राहील. बँक निफ्टी आठवड्यात ५७०१० पातळीच्या जवळ बंद झाला आणि ५७२००-५७३०० झोनमध्ये कडक प्रतिकाराचा (Resistance) सामना करत राहिला.निर्देशांक एकत्रीकरण टप्प्यात आहे तात्काळ ५७००० पातळीच्या आसपास प्रतिकार दिसून आला. ५७६३० पातळीच्या वर ब्रेकआउटमुळे ५८००० आणि ५८५०० पातळीच्या पातळींकडे तेजीची रॅली येऊ शकते. उलट, ५६२७५ पातळीच्या प्रमुख समर्थनाखालील ब्रेकमुळे ५५५५०-५५१५० पातळीपर्यंत आणखी घसरण होऊ शकते. पुढी ल ट्रेंड निश्चित करण्यासाठी व्या पाऱ्यांनी या श्रेणीच्या पलीकडे निर्णायक पाऊल उचलावे.
संस्थात्मक क्रियाकलापांच्या आघाडीवर, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) सलग पाचव्या सत्रात त्यांची विक्रीची मालिका वाढवली, २५ जुलै रोजी १९७९ कोटी किमतीच्या इक्विटीज ऑफलोड केल्या. याउलट, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DIIs) निव्वळ खरेदीदार राहिले, त्याच दिवशी २,१३८ कोटी इक्विटीजमध्ये गुंतवले. अनिश्चितता आणि वाढलेल्या अस्थिरतेने चिन्हांकित सध्याच्या बाजारातील वातावरण लक्षात घेता, व्यापाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो की त्यांनी ' थांबा आणि पहा ' भू मिका राखावी, विशेषतः लीव्हरेज्ड पोझिशन्स हाताळताना. जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी रॅलींवर आंशिक नफा बुक करणे आणि घट्ट ट्रेलिंग स्टॉप-लॉस वापरणे ही शिफारसित धोरणे आहेत. जर निफ्टी २५,१५० पातळीच्या वर टिकून राहिला तरच नवीन लॉ न्ग पोझिशन्सचा विचार केला पाहिजे. एकंदरीत, बाजारातील भावना सावधपणे तेजीत राहते, व्यापाऱ्यांनी प्रमुख ब्रेकआउट पातळी आणि जागतिक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे'.
आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले की,' प्रमुख आधार २४४५० आणि २४००० पातळीवर आहेत, परंतु आठवड्याची सुरुवात अशी होईल की घसरणीचे प्रमा ण २४७५० -६५० क्षेत्राच्या पलीकडे जाणार नाही. या आठवड्यात उच्च स्विंग अपेक्षित आहे, परंतु इंट्राडे पिरियडिटीजमध्ये दिसणारे ऑसिलेटर डायव्हर्जन्स जे तेच दर्शवितात, ते मोठ्या वेळेत अद्याप दिसून येणार नाहीत. यामुळे घसरणीच्या गतीला आणखी का ही काळासाठी वर्चस्व राखता येईल. तथापि, २४९२२ पातळीवरील थेट वाढ शॉर्ट कव्हरिंग सुरू करू शकते. अशा परिस्थितीत, २५३२४ पातळीसाठी खेळ केला जाऊ शकतो, जरी २५००० क्षेत्र सुरुवातीला प्रतिकार करू शकते.'
बाजारातील सुरुवातीच्या परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले की,'नकारात्मक बातम्या आणि ट्रिगर्समुळे निफ्टी एका महिन्याच्या नीचांकी पातळीवर पोहोच ला आहे आणि बाजारातील भावना अजूनही प्रतिकूल आहेत. सुरुवातीला कठीण वाटणाऱ्या जपान आणि युरोपियन युनियनसोबतच्या व्यापार करारानंतरही भारत-अमेरिका व्यापार कराराची अपेक्षा अजूनही कायम आहे. याचा बाजारातील भावनांवर परिणाम झा ला आहे. आयटी निर्देशांकातील तीव्र कपात बाजाराला खाली खेचत आहे आणि टीसीएसने जाहीर केलेल्या जागतिक कर्मचाऱ्यांमध्ये २% कपात पाहता यात कोणताही दिलासा नाही. तथापि, मिडकॅप आयटी नावे त्यांच्या मजबूत वाढीच्या शक्यता लक्षात घेता आ शादायक आहेत. गेल्या आठवड्यात रोख बाजारात १३५५२ कोटी रुपयांच्या एफआयआय विक्रीमुळे बाजारातील कमकुवतपणात भर पडली आहे. आणखी एक चिंता म्हणजे पहिल्या तिमाहीचे निकाल, जे अद्याप कोणतेही मोठे सकारात्मक आश्चर्य दर्शवत नाही त. बाजाराच्या या कमकुवत टप्प्यात गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि स्टॉक-स्पेसिफिक राहावे. आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक सारख्या लार्जकॅप बँकांमध्ये सुरक्षितता आहे ज्यांनी या विभागात सर्वोत्तम निकाल दिले आहेत आणि पुढे सुधा रणा होण्याची शक्यता आहे.'
आजच्या बाजारातील निफ्टीवर गुंतवणूकदारांचे बारकाईने लक्ष असून विशेषतः अस्थिरता निर्देशांक व बँक निर्देशांकात अखेरच्या सत्रात काय घडेल यावर आजचे भवितव्य बाजारात निश्चित होऊ शकते.