"आपला तो बबल्या दुसऱ्याचं कार्ट..." राम कुलकर्णी यांची विखारी टिका, रोहिणी खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई: शरद पवार गट राष्ट्रवादी पक्ष महिला अघाडी प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल यांना पुण्यात रेव्ह पार्टी करतांना पोलिसांनी रंगेहात पकडल्या नंतर रोहिणी खडसे यांची पदावरून हकालपट्टी करणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता भाजप आणि पोलिसांवरच खडसे यांचा पक्ष आरोप करत असल्याचे दिसून येत आहे. ज्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी व्हिडीओच्या माध्यमातून विखारी टीका केली.


महायुती सरकारला विरोध करायचा आणि खडसे बापलेकीला समर्थन द्यायचे म्हणून शरद पवार गटाचे व उबाठाचे नेते काहीही बोलत सुटले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका करताना राम कुलकर्णी यांनी सुप्रिया सुळे, रोहित पवार यांबरोबरच शरद पवार राष्ट्रवादी पक्षधोरणांवर देखील प्रश्न उपस्थित केले. "जयंत पाटील पायउतार झाल्यापासून पक्षात प्रमुख भुमीका बजावणारे, सत्ताधारी पक्षावर बेछूट अरोप करत मोबाईल फूटेस्तोवर ट्विट करणारे रोहित पवार यांची दातखिळी बसली का ?" असा सवाल त्यांनी केला. तर "सुप्रिया सुळे या प्रकरणात रोहिणी खडसे यांचा राजीनामा घेतील असे वाटले पण त्यांनाही सदर प्रकरणात राजकिय वास येणे योग्य नव्हे." असे देखील त्यांनी म्हंटले.



रोहिणी खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी


शरद पवारांच्या पक्षात काही नैतिकता असेल तर खऱ्या अर्थाने अगोदर रोहिणी खडसे यांचा त्यांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी करत आपला तो बबल्या दुसऱ्याचं कार्ट , असं राजकारण चालत नसतं असे खडसावले.

Comments
Add Comment

RSS Chief Mohan Bhagwat : मोहन भागवत अमेरिकेत दाखल; न्यूयॉर्कमध्ये ५ हजार जणांच्या मेळाव्याला करणार संबोधन

RSS Chief Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत मंगळवारी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात दाखल झाले.

Radhakrishna Vikhe Patil : मराठा समाजाच्या मागण्यांवर शासन सकारात्मक; प्रलंबित विषयांवर तातडीने कार्यवाहीचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

मुंबई : मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत (Maratha Community's Demands) राज्य शासन सकारात्मक असून, विविध प्रशासकीय विभागांकडे

Navnath Ban : आदिवासी शाळांच्या अनुदानावरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा; नवनाथ बन यांचा संजय राऊतांना सवाल

मुंबई : आदिवासी आश्रमशाळा, विद्यार्थ्यांना मिळणारे अनुदान आणि शाळांमधील कथित गैरप्रकारांवरून महाराष्ट्रातील

BJP Vs Congress : राहुल गांधींच्या पत्रावर भाजपचा पलटवार

- आदिवासी शाळांमधील गैरकारभारासाठी काँग्रेस नेतेच जबाबदार; राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या मुद्यावर राजकारण

Sharad Pawar : शरद पवारांनी बोलावली कार्यकारिणीची तातडीची बैठक

- दोन्ही राष्ट्रवादीत घडामोडींना वेग; २९ ऑगस्टच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष मुंबई : पार्थ पवार आणि शरद

Maharashtra Cabinet Decisions : नागपूरमध्ये लता मंगशेकर विद्यापीठ, खेळाडूंच्या रोख बक्षीस धोरणात सुधारणा यांसह राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत जनहिताचे