Sunday, October 26, 2025
Happy Diwali

Mumbai Ganeshotsav : गणेशोत्सव मंडळांना BMCचा दणका! खड्डा खोदला तर थेट १५ हजारांचा दंड; मुंबईत मंडळांची चिंता वाढली

Mumbai Ganeshotsav : गणेशोत्सव मंडळांना BMCचा दणका! खड्डा खोदला तर थेट १५ हजारांचा दंड; मुंबईत मंडळांची चिंता वाढली

मुंबई : गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही आठवडे बाकी असताना, मुंबई महापालिकेने गणेशोत्सव मंडळांवर नवा बडगा उगारला आहे. गणेश मंडळांनी जर सार्वजनिक रस्त्यावर खड्डा खोदला, तिथे मंडपाचे काम केलं, तर त्यांना थेट १५,००० रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. मागील वर्षी हा दंड केवळ २ हजार रुपये होता. त्यामुळे यंदा तो साडेसात पटीनं वाढवण्यात आलाय.

महापालिकेच्या या निर्णयामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक मंडळांनी या दंडाच्या निर्णयाचा जोरदार विरोध केला असून, तात्काळ हा आदेश मागे घेण्याची मागणीसुद्धा केली आहे. गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव मंडळांना परवानग्या, अटी आणि आर्थिक बोजामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात आता वाढीव दंडामुळे मंडळांच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment