Tuesday, August 19, 2025

एअरटेलच्या नेक्स्ट्राने अँपिनसोबत अक्षय ऊर्जा सोर्सिंग करार २०० मेगावॅटपर्यंत वाढवला

एअरटेलच्या नेक्स्ट्राने अँपिनसोबत अक्षय ऊर्जा सोर्सिंग करार २०० मेगावॅटपर्यंत वाढवला

ही अतिरिक्त हरित ऊर्जा कमी कार्बन संगणकीय प्रक्रियांना चालना देईल आणि दरवर्षी नेक्स्ट्राचे सुमारे १४९१५६ टन CO2e उत्सर्जन कमी करण्यास मदत करेल


मुंबई: एअरटेलच्या नेक्स्ट्रा आणि अँपिन एनर्जी ट्रान्झिशन यांनी इंटरस्टेट ट्रान्समिशन सिस्टिमशी (ISTS) जोडलेल्या प्रकल्पांमधून १२५.६५ मेगावॅट सौरपवन संकरित ऊर्जेचा समावेश असलेल्या नवीन पॉवर-व्हीलिंग कराराच्या माध्यमातून आपली भागीदारी अ धिक बळकट केली आहे. या करारामुळे दोन्ही कंपन्यांमधील एकूण अक्षय ऊर्जा भागीदारी 200 मेगावॅटच्या पुढे गेली आहे. याविषयी कंपनीने म्हटले,' ही भागीदारी नेक्स्ट्रा च्या पायाभूत सुविधा कार्यक्षमतेत वाढ,अधिक सखोल डीकार्बोनायझेशन आणि ऑपरेशन ल उत्कृष्टतेत प्रगती साधण्यास मदत करेल तसेच शाश्वत डेटा सेंटर सोल्यूशन्समध्ये नेक्स्ट्राला भारतातील आघाडीचे स्थान अधिक दृढ करण्यास सहाय्य करेल.' प्रत्येकी राजस्थान आणि कर्नाटकमधील कॅप्टिव्ह सौरपवन ऊर्जा प्रकल्पांद्वारे अतिरिक्त क्षमता नेक्स्ट्रा ला दोन टप्प्यांमध्ये दिली जाईल. सध्या अँपिन उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिशामध्ये इंट्रास्टेट ओपन अ‍ॅक्सेसच्या माध्यमातून नेक्स्ट्राला सौरऊर्जा पुरवत आहे. या नवीन कराराच्या अंतर्गत, अँपिन आणखी ११ राज्यांमध्ये विस्तार करेल आणि मोठ्या प्रमाणात (I STS) आधारित अक्षय ऊर्जा पुरवठा तसेच एका स्वतंत्र वीज उत्पादकाकडून (IPP) अखंड अक्षय ऊर्जा वितरण यांसारखी आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली देखील लागू करेल.


याविषयी बोलताना एअरटेलच्या नेक्स्ट्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आशिष अरोरा म्हणाले,' शाश्वतता ही केवळ एक वचनबद्धता नाही ती आमची जबाबदारी आणि नेतृत्व करण्याची एक संधी आहे.अँपिन सोबतच्या भागीदारीद्वारे 200 मेगावॅटहून अधि क अक्षय ऊर्जेच्या माध्यमातून आमच्या डिजिटल पायाभूत सुविधांना बळकटी देत आम्ही उद्योगासाठी नव्या मानदंडांची स्थापना करत आहोत.ही कामगिरी, ISTS समर्थित स्वच्छ ऊर्जेचा वापर करून आमच्या सुविधांना शाश्वतपणे वीजपुरवठा, विश्वासार्हतेत वाढ आणि प्रत्यक्ष हवामान परिणाम साध्य करण्यात आमच्या नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित करते. नेक्स्ट्रामध्ये आम्ही नवकल्पनांना चालना देण्यासाठी आणि कृतीस प्रेरणा देण्यासाठी कटिबद्ध आहोत आमचे ऑपरेशन्स भारताच्या डिजिटल प्रगतीला पाठिंबा देतातच प ण भविष्यातील पिढ्यांसाठी पर्यावरणाचे संरक्षणदेखील सुनिश्चित करतात.'


या लाँचदरम्यान अँपिन एनर्जी ट्रान्झिशन चे संस्थापक व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि (CEO) पिनाकी भट्टाचार्य म्हणाले,' या भागीदारीद्वारे आम्ही हे दाखवून देत आहोत की,अखंड आंतर-राज्य आणि राज्यांतर्गत अक्षय ऊर्जा उपायांचा मिलाफ व अखिल भारतीय उपस्थितीच्या आधारावर आम्ही कोणत्याही ग्राहकाला जवळपास 100% ऊर्जा संक्रमणाच्या प्रक्रियेत यशस्वीरित्या सहभागी करू शकतो. डेटा व वेगाने वाढणाऱ्या डेटा सेंटर क्षेत्रात आघाडीवर असलेली नेक्स्ट्रा ही आमच्या शाश्वततेविषयक दृष्टीकोनाशी सु संगत आहे आणि या सहकार्याच्या माध्यमातून डेटा सेंटर्स अधिक हरित बनवण्यात योगदान देत असल्याचा आम्हाला अभिमान आहे.'


स्केलेबल आणि शाश्वत ऊर्जा उपाय प्रदान करण्यामध्ये एएम्पिन एनर्जी ट्रान्झिशनचे नेतृत्व हे विविध तांत्रिक आणि भौगोलिक क्षेत्रांमध्ये त्यांच्या ग्राहकांशी दीर्घकालीन संबंध निर्माण करण्याच्या प्रोग्रामॅटिक दृष्टिकोनाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.एकत्रितपणे दोन्ही कंपन्यांचे उद्दिष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणातील अक्षय ऊर्जा भागीदारीद्वारे संपूर्ण प्रणालीस्तरावर कार्यक्षमता वाढवणे आणि डीकार्बोनायझेशनसारख्या बदलांना चालना देणे. नेट झिरो वचनबद्धतेप्रमाणे, जी आता SBTi संरेखित आहे,एअरटेलच्या नेक्स्ट्राने त्यांच्या डि जिटल पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर डीकार्बोनायझेशन सक्षम करून त्यांच्या शाश्वत उपक्रमांना वेग दिला आहे.कंपनीने त्यांच्या कार्यपद्धतीत Scope 1 आणि Scope 2 मधील ग्रीनहाऊस गॅस (GHG) उत्सर्जन कमी करण्यासाठी अनेक उपाय योजले आहे त. नेक्स्ट्रा जून २०२४ मध्ये जागतिक RE100 उपक्रमात सहभागी झाली आणि आपली १०० % वीज अक्षय स्रोतांमधून घेण्याचे वचन दिले. यामुळे नेक्स्ट्रा भारतातील पहिले डेटा सेंटर आणि या उपक्रमात सहभागी होणारी १४ वी भारतीय कंपनी बनली.

Comments
Add Comment