साप्ताहिक राशिभविष्य, २७ जुलै ते २ ऑगस्ट २०२५
![]() | प्रसिद्धीसह अर्थार्जनाची वृद्धीमेष : पूर्वार्धात ग्रहांचे नैसर्गिक पाठबळ काही अंशी कमी राहिल्याने मिश्र स्वरूपाची फळे प्रतिपादित होण्याची शक्यता आहे. खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल. घरासाठी तसेच कुटुंबीयांच्या गरजांसाठी खर्च करावा लागेल. घरातील वापरात असलेली उपकरणे तसेच वाहनांच्या देखभालीच्या खर्चात वाढ होऊ शकते. घरातील भौतिक सुखसुविधेत वाढ होईल. कुटुंबात किंवा आपल्या कार्यक्षेत्रात आपली मते इतरांवर लादू नका. कुटुंब परिवारात शुभकार्याची नांदी. तरुण-तरुणींचे नोकरीविषयक प्रश्न सुटतील. साहित्य क्षेत्रातील जातक कलाकारांचे भाग्योदय. प्रसिद्धीसह अर्थार्जनाची वृद्धी होईल. आपल्या आवडत्या कार्यक्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळेल. |
![]() | समस्या संपुष्टात येतीलवृषभ : रोजच्या आठवड्यात शुभ ग्रहांची उत्तम साथसंगत लाभेल. आपल्या हातात असलेली महत्त्वाची कार्य पूर्ण करण्यासाठी अनुकूल कालावधी. तसेच जमीन-जुमला, स्थावर मालमत्तेची दीर्घ काळ रखडलेली कामे मार्गी लागतील. समाधान मिळेल. कुटुंब परिवारातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण केल्याचे समाधान लाभून कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळेल. तरुण-तरुणींच्या समस्या संपुष्टात येतील. काहींना आपल्या मनातील जीवनसाथी निवडता येईल. प्रेमात सकारात्मक प्रतिसाद मिळेल. काहींचे विवाह जमतील. तरुण-तरुणी आपल्या अर्थार्जनाचा शुभारंभ करू शकतील. विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण परदेशी घेण्याचे स्वप्न साकार होईल. शिष्यवृत्तीचा लाभ होईल. व्यवसाय-धंद्यात नावीन्यपूर्ण कल्पना राबवू शकाल. |
![]() | आत्मविश्वास वृद्धिंगत होईलमिथुन : स्वतःचा आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. आत्मविश्वासाने आपल्या समोरील कामे आपण पार पाडू शकाल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. जमीन-जुमला, स्थावर मालमत्ता, वडिलोपार्जित संपत्ती याविषयीची कार्य पूर्ण होतील. अडचणी अथवा समस्या संपुष्टात येतील. नोकरी-व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील. जुनी येणी वसूल होतील. मात्र वसुली करताना वादविवाद टाळणे महत्त्वाचे. अतिआत्मविश्वास टाळा. ‘‘सर सलामत तो पगडी पचास” हे जाणून आपल्या कार्यक्षेत्रातील निर्णय घेणे आवश्यक ठरेल. नातेवाईक, आप्तेष्ट मित्रमंडळी यांच्याबरोबर आर्थिक व्यवहार शक्यतो टाळणे हिताचे राहील. |
![]() | मार्गदर्शन व मदत मिळेलकर्क : आजपर्यंत आपण उराशी बाळगलेल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शुभ ग्रहांचा पाठिंबा. रखडलेली, रेंगाळलेली कार्य मार्गी लागतील. जे जातक स्वतःच्या मालकीच्या घराचे स्वप्न बघत होते अशा जातकांचे स्वप्न साकार होऊ शकते. मात्र त्यादृष्टीने प्रयत्न आवश्यक आहे. प्रयत्नांना यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीविषयी असलेले वाद संपुष्टात येतील. रखडलेली जमिनी मालमत्तेसंबंधीची कार्य मध्यस्थांमार्फत मार्गी लागतील. विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. जे जातक नोकरीच्या शोधात होते त्यांना नोकरी मिळू शकते. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. |
![]() | व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेलसिंह : सध्याच्या कालावधीमध्ये सकारात्मक विचार ठेवणे गरजेचे. विविध क्षेत्रांत अनेक स्तरांवर बदल जाणवेल. नोकरी-व्यवसाय-धंद्यात अनपेक्षित लाभ होतील. प्रशंसेस पात्र ठराल. आपण पूर्वी केलेल्या कामाबद्दल बक्षीस मिळू शकते. तरुणांना नोकरीसाठी बोलावणे येईल. सरकारी नोकरीत अतिरिक्त कार्यभार सोपविला जाण्याची शक्यता. कलाकार, साहित्य क्षेत्रातील जातकांना प्रसिद्धी मिळू शकते. आर्थिक आलेख उंचावेल. आपल्याकडून दर्जेदार कलाकृती सादर होईल. राजकारणाशी संबंधित जातकांना अनुकूल कालावधी. |
![]() | वातावरण प्रसन्न राहीलकन्या : अनुकूल स्वरूपाच्या ग्रहमानामुळे हा कालावधी आनंददायी ठरू शकतो. तरुण-तरुणींचे नोकरीविषयक प्रश्न सुटतील. अर्थार्जनाचा शुभारंभ होईल. चालू नोकरीत पदोन्नती, वेतन निवृत्तीची शक्यता. सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आतापर्यंत रखडलेली कार्य पूर्ण होतील. सरकारी कार्यांचा निपटारा करू शकाल. तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील. व्यवसाय धंद्यात प्रगती. व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील. विद्यार्थ्यांनी आपल्या कार्याकडे लक्ष द्यावे. सावध राहणे गरजेचे. |
![]() | नवे अनुबंध जुळतीलतूळ : कुटुंब परिवारातून वाढत्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागल्यामुळे थोडा ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. एखादे मंगल कार्य तसेच धार्मिक कार्याचे नियोजन होऊ शकते. खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल. प्रवास यशस्वी होऊन नवे अनुबंध जुळतील. कुटुंबात लहान-सहान कारणांवरून वादविवाद निर्माण होतील. परिस्थितीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल. विशेषतः भावंडांबरोबर वादविवाद टाळा. स्वभावात चिडखोरपणा डोकावण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेले स्पर्धात्मक यश मिळेल. |
![]() | विरोध संपुष्टात येईलवृश्चिक : कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. अडचणी, समस्या दूर होतील. काहींचे परिचयोत्तर विवाह होतील. आतापर्यंत चाललेले प्रेमप्रकरण विवाहासारख्या पवित्र बंधनात बंधित होऊ शकते. विरोध संपुष्टात येईल. व्यवसाय-धंद्यात मोठी संधी उपलब्ध होईल. व्यावसायिक विस्तार करण्यासाठी अनुकूल कालावधी. व्यवसाय-धंद्यात नवीन तंत्रज्ञान तसेच नव्या संकल्पना राबविण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. परदेशी व्यापाराच्या संधी मिळतील. नोकरीत पदोन्नती, वेतन वृद्धीसारख्या घटना घडू शकतात. |
![]() | शुभ फळे प्रतिपादित होतीलधनु : शुभ कालावधीत शुभ फळे प्रतिपादित होतील. कुटुंबातील पती अथवा पत्नीचा भाग्योदय होईल. तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील. काहींचे विवाह ठरतील. विद्यार्थ्यांना त्यांनी घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल. उच्चशिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. आपल्या आवडत्या क्षेत्रात शिक्षण घेता येईल. गुरुजनांचे तसेच कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. परदेशी शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार होईल. तरुणांना नोकरी मिळेल. कलाकार, खेळाडू यांना कर्तृत्व सिद्ध करता येईल. चांगल्या संधीचे सोने करा. |
![]() | ओळखी-मध्यस्थी उपयोगी पडतीलमकर : या कालावधीमध्ये जरा सावध राहूनच आपले कार्य पूर्ण करावे. आळस झटकून आजचे काम आजच करण्याची गरज आहे. कार्यमग्न राहा. कामात चालढकल टाळणे हितकारक ठरेल. त्याचप्रमाणे आपल्या कामासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. तसेच कोणावरही डोळे झाकून अतिविश्वास ठेवू नका. महत्त्वाच्या कामात अनपेक्षितरीत्या काही वेळेस समस्या अथवा अडथळा येऊ शकतो. ओळखी मध्यस्थी उपयोगी पडतील. कुटुंबामध्ये कोणाशीही वाद-विवाद नको. विशेषतः ज्येष्ठ मंडळींबरोबर होणारे वादविवाद टाळणे हिताचे ठरेल. व्यवसाय-धंद्यात आर्थिक मदतीची गरज भासू शकते. |
![]() | प्रयत्नशील राहणे आवश्यककुंभ : या कालावधीमध्ये काही महत्त्वाच्या घटना घटित होऊ शकतात. अपेक्षित यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. सरकारी कार्य पूर्ण करण्यासाठी विलंब लागू शकतो. त्यामुळे वैतागून न जाता कार्यरत राहणे. खर्चात अनपेक्षितरीत्या वाढ होईल; परंतु अंतिमतः सकारात्मक निकाल हातात पडेल. दीर्घकाळ रखडलेली जमिनीची तसेच महत्त्वाची कार्य गतिशील होऊन मार्गस्थ होतील. ओळखीचा उपयोग होऊ शकतो. सरकारी स्वरूपाची कामे पूर्ण करण्यासाठी समाजातील प्रभावशाली व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. व्यवसाय धंद्यातील खर्च वाढू शकतो. कामगारांविषयीचे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. सरकारी नियम व कायदे पाळणे आवश्यक. |
![]() | अनुकूलता लाभेलमीन : अनुकूल कालावधीमध्ये शुभ ग्रहांचा प्रभाव राहून त्यांचे सहकार्य लागेल. अचानक सर्वच क्षेत्रांत जबाबदाऱ्यांचे प्रमाण वाढेल. कुटुंब परिवारातील एकोपा राखण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. गैरसमजातून कौटुंबिक आप्तेष्ट, नातेवाईक यांच्यातील मतभेद वाढणार नाहीत याची काळजी घ्या. त्याचप्रमाणे स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देणे हिताचे ठरेल. व्यवसाय-धंद्यात अनुकूलता. व्यवसायात केलेले बदल सकारात्मक राहतील. उलाढाल वाढेल. व्यावसायिक नवे अनुबंध जुळून जुनी नाती नव्याने प्रस्थापित होतील. कुटुंब परिवारातील चिंता मिटतील. नोकरीत पदोन्नती, वेतन वृद्धी योग. परदेशगमनाच्या संधी. राजकारणाशी संबंधितांना अनुकूलता लाभेल. |