वॉशिंग्टन: शनिवारी अमेरिकन एअरलाईन्सचे विमान AA3023मध्ये डेन्वर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना लँडिंग गिअरमध्ये आग लागली. लँडिंग गिअरमध्ये अचानक आग लागल्यानंतर विमानातील सर्व १७३ प्रवासी आणि सहा चालक दलासह सदस्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. डेन्वर फायर डिपार्टमेंटच्या माहितीनुसार ही घटना त्यावेळेस झाली जेव्हा बोईंग ७३७ मॅक्स विमान डेन्वर येथून मियामीसाठी रनवे ३४l साठी उड्डाण करत होते.
FAAने सुरू केली तपासणी
फ्लाईअवेयरच्या माहितीनुसार, फ्लाईट दुपारी १.१२ मिनिटांनी गेट c34साठी रवाना होणार होती. मात्र दुपारी २.४५ मिनिटांच्या सुमारास टेकऑफदरम्यान, संभाव्य लँड गिअर घटनेची माहिती मिळाली. प्रवाशांना बसच्या सहाय्याने टर्मिनलपर्यंत पोहोचवण्यात आले. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने या घटनेची तपासणी सुरू केली आहे.