Monday, August 18, 2025

रेल्वेतील निकृष्ट जेवणाच्या ६ हजार ६४५ तक्रारी, रेल्वेमंत्र्यांनीच दिली राज्यसभेत कबुली

रेल्वेतील निकृष्ट जेवणाच्या ६ हजार ६४५ तक्रारी, रेल्वेमंत्र्यांनीच दिली राज्यसभेत कबुली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेतील जेवणाच्या निकृष्ट दर्जाबद्दल २०२४-२५ या आर्थिक वर्षात ६ हजार ६४५ तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव पांनी राज्यसभेत दिली.


प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींमुळे रेल्वतील खानपान सेवेच्या गुणवत्तेवर गोठे प्रश्नचिन्ह निमांग झाल आहे. राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेमंत्र्यांनी ही आकडेवारी सादर केली. माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार जॉन विटास यांनी रेल्वेतील जेजणाचा दर्जा व कंत्राट वाटपातील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले होते, ज्यावर रेल्वेमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिले.


रेल्वेमंत्र्यांना दिलेल्या माहितीनुसार, प्राप्त झालेल्या एकूण ६ हजार ६४५ तक्रारींवर विविध स्तरांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये १ हजार ३४१ प्रकरणांमध्ये अन्न पुरवठादारांवर दंड ठोठावण्यात आला. २ हजार ९९५ प्रकरणांमध्ये संबंधित कंत्राटदारांना कड़क शब्दांत ताकीद देण्यात आली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >