फ्रान्सच्या घोषणेने इस्राायलचा संताप
पॅरिस : फ्रान्सने पॅलेस्टाईनला ‘स्वतंत्र देश’ म्हणून मान्यता देण्याची घोषणा केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. असे करणारा फ्रान्स हा पहिला जी-७ देश बनणार आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या या निर्णयाचे पॅलेस्टाईनने स्वागत केले, तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू या निर्णयावर संताप व्यक्त केला.
राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली.
सप्टेंबरमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेत हा निर्णय लागू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या पोस्टमध्ये,”आज सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गाझामधील युद्ध थांबवणे आणि लोकांना वाचवणे” असे म्हटले आहे. ”आम्हाला तात्काळ युद्धबंदी, सर्व ओलिसांची सुटका आणि गाझाच्या लोकांसाठी मोठ्या प्रमाणात मानवतावादी मदत हवी आहे,” आपण हमासचे निशस्त्रीकरण केले पाहिजे, गाझा सुरक्षित आणि पुनर्बांधणी केली पाहिजे आणि पॅलेस्टिनी राज्य निर्माण केले पाहिजे.” असे त्यात पोस्टमध्ये नमूद केले आहे.
ऑक्टोबर २०२३ पासून पॅलेस्टिनी संघटना हमास आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे, हे सांगावे लागेल. या युद्धात हजारो लोक मृत्युमुखी पडले. इस्रायली सरकार पॅलेस्टाईनला वेगळ्या देशाचा दर्जा देण्यास विरोध करत आहे हे नमूद करणे महत्त्वाचे आहे.