‘रंगवेद’ आणि नाट्यकलेचा प्रयोग...

राजरंग : राज चिंचणकर


एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने ठाम निश्चय करून एखादे कार्य जिद्दीने हाती घेतले, तर ते निश्चितच तडीस जाऊ शकते. नाट्यसृष्टीत अलीकडेच असे एक उदाहरण कायम झाले आहे. मुंबईस्थित ‘रंगवेद’ या नाट्यसंस्थेने कोकणातल्या दुर्गम भागात जाऊन नाट्यकलेचा एक प्रयोग केला आणि रंगमंचावर एक अनोखा प्रवेश लिहिला गेला.


नाटक म्हणजे काय, याची काहीच कल्पना नसलेल्या मंडळींसमोर नाट्यकला सादर केली गेली तर, त्यांची प्रतिक्रिया पाहणे नक्कीच महत्त्वाचे ठरेल. असा एक प्रयोग करण्याचे ‘रंगवेद’ संस्थेच्या कलाकारांच्या मनात आले आणि त्यांनी त्याला मूर्त स्वरूप देण्याचा संकल्प केला. अशाप्रकारचा एखादा उपक्रम जेव्हा एखादी संस्था आणि तिचे कार्यकर्ते दुर्गम भागातल्या आदिवासी मुलांसाठी राबवतात; तेव्हा ती नक्कीच दखल घेण्याजोगी गोष्ट ठरते.


कुडाळजवळच्या मु. पो. वेताळ बांबूर्डे या आदिवासी पाड्यात ‘शोषित मुक्ती अभियान’ ही संस्था कार्यरत आहे. याच संस्थेच्या ‘नाग्या महादू निवासी वसतिगृह’ येथे भटक्या जमातीच्या मुलांपर्यंत ‘रंगवेद’ संस्था जाऊन पोहोचली. या संस्थेचे कार्यकर्ते व रंगकर्मी शीतल तळपदे, हिमांगी शुक्ल, संध्या ओक, प्रतिमा कंटक आदींच्या मार्गदर्शनाखाली सुनिता रामटेके, अभिषेक थोरात, शिवांजली सापे आदी कलाकार यात कार्यरत होते. नाट्यशास्त्रातल्या नवरसांची ओळख करून देत या कलाकारांनी त्या मुलांमध्ये दडलेले कलागुण शोधून काढले. हे कार्य बजावताना, ती मुले शहरी चालीरीतींपासून दूर आहेत असे वाटलेच नाही; असा अनुभव या कलाकारांना आल्याचे ही मंडळी सांगतात.


या अनोख्या उपक्रमाबद्दल ‘रंगवेद’चे कलाकार म्हणतात, “कधीही नाटक हा प्रकार पाहिलेला नसताना व आत्मविश्वासाचा पूर्णपणे अभाव असताना त्या मुलांकडून असे काही करून घेणे खरे तर कठीण होते. पण आमच्या कलाकारांनी हे आव्हान स्वीकारले. तुम्ही जंगलातले भटके लोक नाहीत; तर तुम्ही जंगलचे राजे आहात; अशा आशयाच्या त्यांना येत असलेल्या गाण्याचा उपयोग करून, ‘मदत’ या मध्यवर्ती संकल्पनेवर एक नाटक तिथे बसवले गेले. या मुलांना शिकवताना एक गोष्ट आम्हाला प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे निसर्ग हा सर्वात मोठा गुरू असतो. निसर्गाच्या सानिध्यात वाढणाऱ्या या मुलांमध्ये असलेले सूर, ताल आणि नाद यांचे उपजत ज्ञान अचंबित करणारे होते. ज्यांना ‘नाटक’ या प्रकाराची काहीही कल्पना नाही, अशा मुलांकडून नाटक बसवून घेण्याचा आनंद काय असतो; हे व्यक्त करायला आमच्याकडे शब्दच नाहीत”.

Comments
Add Comment

‘चिरंजीव परफेक्ट’ बिघडलाय!

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  विनोद रत्ना हा नव्या पिढीचा लेखक, अभिनेता व दिग्दर्शक आहे. ‘चिरंजीव परफेक्ट

कलासक्त कलाकारांच्या ऊन-पावसाची कथा ...

राजरंग : राज चिंचणकर नाट्यसृष्टीत प्रायोगिक व व्यावसायिक असे दोन प्रवाह असल्याचे साधारणतः मानले जाते. पण त्याही

महाराष्ट्राची सुपरस्टार या कार्यक्रमासाठी निवड...

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल धनश्री काडगावकरने विविध भूमिका साकारून स्वतःची अशी अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळख

प्रेम करावं नाटकावर... शंभरीच्या उंबरठ्यावर...!

राजरंग : राज चिंचणकर रंगभूमीवर एखाद्या नाटकाचे शंभर प्रयोग होणे, ही नाट्यसृष्टीच्या दृष्टीने नवीन गोष्ट नाही.

पारदर्शक दुधारी तलवारीचा वापर

पाचवा वेद : भालचंद्र कुबल गेल्या महिन्यापासून सुरू झालेल्या शासन पुरस्कृत राज्य नाट्य स्पर्धा आणि त्यासाठी

रेणुका शहाणेची 'धावपट्टी' ऑस्करला

अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी तयार केलेला 'धावपट्टी' हा अॅनिमेटेड लघुपट ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट झाला असून ही