पंतप्रधान मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते, ट्रम्प आणि मेलोनीना टाकले मागे

लोकप्रियतेच्या यादीत ट्रम्प पिछाडीवर


नवी दिल्ली: मॉर्निंग कन्सल्टने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, पंतप्रधान मोदी जागतिक लोकप्रियतेच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत, तर दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे-म्युंग दुसऱ्या आणि अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मायली तिसऱ्या स्थानावर आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय लोकशाही नेते म्हणून उदयास आले आहेत. बिझनेस इंटेलिजेंस कंपनी मॉर्निंग कन्सल्टने जारी केलेल्या जुलै २०२५ च्या ताज्या सर्वेक्षण अहवालानुसार, पंतप्रधान मोदींना ७५% लोकांचे अनुमोदन रेटिंग मिळाले आहे. हे सर्वेक्षण ४ जुलै ते १० जुलै दरम्यान करण्यात आले आणि त्यात २० हून अधिक देशांच्या नेत्यांचे रेटिंग समाविष्ट होते.

पंतप्रधान मोदी पहिल्या क्रमांकावर,तर इतर नेते कोणत्या स्थानावर?


भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनीही त्यांच्या पोस्टमध्ये या अहवालाचा डेटा शेअर केला आहे. मॉर्निंग कन्सल्टने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, पंतप्रधान मोदी पहिल्या स्थानावर असून दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे-म्युंग अनुमोदन रेटिंग ५९% द्वारे दुसऱ्या स्थानावर आहेत.

अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मायली तिसऱ्या स्थानावर आहेत, ज्यांना ५७% लोकांचा पाठिंबा आहे. त्यांच्या पाठोपाठ कॅनडाचे मार्क कार्नी (५६%) आणि ऑस्ट्रेलियाचे अँथनी अल्बानीज (५४%) आहेत.

ट्रम्प नावडते, ५०% लोक त्यांच्या विरोधात


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ४४% लोकांचा पाठिंबा आहे, परंतु ५०% लोक त्यांच्या विरोधात आहेत. त्याच वेळी, सर्वात कमी लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि चेक रिपब्लिकचे पंतप्रधान पेट्र फियाला यांचा समावेश आहे, ज्यांना फक्त १८% लोकांचा पाठिंबा मिळाला आहे, तर ७४% लोक त्यांच्यावर असमाधानी आहेत.

इतर प्रमुख नेत्यांची भूमिका:


इटलीचे जॉर्जिया मेलोनी: ४०% समर्थन, ५४% नापसंती

जर्मनीचे फ्रेडरिक मर्झ: ३४% समर्थन, ५८% नापसंती

तुर्कीचे रेसेप तय्यिप एर्दोगान: ३३% समर्थन, ५०% नापसंती

ब्राझीलचे लुला दा सिल्वा: ३२% समर्थन, ६०% नापसंती

ब्रिटनचे केयर स्टारमर: २६% समर्थन, ६५% नापसंती

जपानचे शिगेरू इशिबा: २०% समर्थन, ६६% नापसंती
Comments
Add Comment

"लवकर तोडगा निघेल अशी आशा..." ट्रम्पच्या H-1B व्हिसा शुल्क वाढीवर भारताची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली: डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसा अर्जांवरील शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताने पहिली

आयफोन १७ प्रो मॅक्स खरेदी करणारा पहिला तरुण

नवी दिल्ली : मुंबईमध्ये राहणाऱ्या अंकुश गोयल याने भारतातील पहिला आयफोन १७ प्रो मॅक्स खरेदी करण्याचा मान मिळवला

दिल्लीमध्ये एआयचा गैरवापर करून महिलेवर अत्याचार

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये लाहोरी गेट परिसरात एआयचा गैरवापर करून एका महिलेवर अत्याचार करण्यात आले. त्या महिलेने

झिरो बॅलेन्स अकाऊंट असूनही एटीएममधून काढले पैसे

एटीएमच्या तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांची झुंबड जयपूर : राजस्थानच्या अलवर आणि मेवात परिसरात असलेल्या स्टेट बँक

Zubin Garg Death: गायक झुबीन गर्गचे अपघाती निधन की हत्या? व्यवस्थापक आणि आयोजकावर गुन्हा दाखल

गुवाहाटी: 'या अली', 'जाणे क्या होगा रामा रे', 'दिलरुबा' सारखे बॉलीवूड मधील सुपरहिट गाणी देणारा सुप्रसिद्ध

परावलंबन हाच देशाचा मोठा शत्रू; स्वावलंबी बनण्याचे पंतप्रधान मोदींचे देशवासियांना आवाहन

नवी दिल्ली : या जगात आपला कोणीही शत्रू नाही. भारताचा कोणी शत्रू असेल तर तो म्हणजे इतर देशांवरील आपलं अवलंबित्व. आपण