Tuesday, August 26, 2025

'प्रहार' शनिवार विशेष लेख: निवृत्ती ही निवड नाही तर ते आहे खरे नियोजन !

'प्रहार' शनिवार विशेष लेख: निवृत्ती ही निवड नाही तर ते आहे खरे नियोजन !

लेखक- फिनसर्व्ह प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि एमडी राम गायकवाड

बहुतेक भारतीयांसाठी, विशेषतः कार्यरत असणाऱ्या व्यावसायिकांसाठी, निवृत्ती हे एक भविष्कालीन ध्येय असते जे नंतर साध्य करता येते. तथापि, सत्य सोपे आहे परंतु अपरिहार्य आहे.निवृत्ती ही ऐच्छिक नाही. हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील टप्पा आहे मग तो व्यक्ती त्यासाठी योजना आखत असो वा नसो. एखादी व्यक्ती आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र किंवा अवलंबून असेल की निवृत्तीमध्ये प्रवेश करेल हे अनिश्चित आहे. सार्वत्रिक पेन्शन प्रणालीच्या अनुपस्थितीत आणि वाढत्या आयुर्मान आणि वैद्यकीय महागाईमुळे, निवृत्ती नि योजन हे भारतातील आर्थिक कल्याणाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे तरी सुद्धा गैरसमज, मिथक (Myths) किंवा सुरक्षिततेच्या चुकीच्या भावनेअंती ते अनेकदा दुर्लक्षितही केले जाते. तुमचा उद्याचा काळ सुरक्षित करण्यासाठी आजच नियोजन करणे का आव श्यक आहे यावर बारकाईने नजर टाकूया..

बदलते निवृत्ती परिदृश्य (The Changing Retirement Landscape) -

भारतात सरासरी निवृत्तीचे वय साधारणतः ५८ ते ६० वर्षे आहे, तर विशेषतः शहरी भागात हळूहळू आयुर्मान वाढतंय आता ते ७५ ते ८० वर्षांच्या दरम्यान आहे. याचा अर्थ बहुतेक व्यक्ती निवृत्तीनंतर २०-२५ वर्षे जगतात असा अंदाज आपण पकडूयात जो स्थिर उ त्पन्नाशिवाय जगण्यासाठी बराच अवधी असतो.आज, एक मध्यमवर्गीय कुटुंब साधारणपणे दरमहा ४०,०००- ५०००० रूपये खर्च करते. ६% महागाई दराने पकडल्यास हा मासिक खर्च २५ वर्षांत १.७ लाखांपर्यंत वाढेल. जर तुम्ही ६० व्या वर्षी निवृत्त झालात आणि ८५ वयापर्यंत जगलात आणि तुमची मासिक गरज ८०,००० तरी (भविष्यातील मूल्यात) असेल तर तुम्हाला तुमची जीवनशैली टिकवून ठेवण्यासाठी २.४ कोटींपेक्षा जास्त खर्च येईल. (यामध्ये आपत्कालीन परिस्थिती किंवा आरोग्यसेवा खर्च समाविष्ट नाही.)

सामान्य गैरसमज दूर करणे (Busting The Common Myths)

गैरसमज १: 'निवृत्तीबद्दल विचार करण्यासाठी मी खूप लहान आहे' (I am too young to think about retirement) -

यामुळेच लवकर सुरुवात करणे केवळ हुशारी नाही तर ते आर्थिकदृष्ट्या कार्यक्षम होण्याचे साधन आहे. १०% वार्षिक परताव्यावर (Annual Returns) सह ६० व्या वर्षी २ कोटी जमा करण्यासाठी २५ व्या वर्षी सुरुवात केल्यास फक्त ४,००० रूपये महिना गुंतव णूक करावी लागते. जर पाच वर्षे पुढे गुंतवणूक आणखी केली असेल तर मासिक गुंतवणूक ६,६०० रूपयांपपर्यंत वाढते. ३५ वर्षांपर्यंत वाट पाहिल्यावर ते ११,००० रूपयांपर्यंत वाढते. स्पष्टपणे सांगायचे झाले तर ही चक्रवाढ (Compond) लवकर सुरुवात करणा ऱ्यांना बक्षीस (Rewards) देते.

गैरसमज २: 'माझा पीएफ आणि ग्रॅच्युइटी पुरेसे असतील' (My PF and Gratuity will be enough)

पीएफ ग्रॅच्युइटीचे पैसै पुरेसे हे क्वचितच असतात. ३० वर्षांच्या स्थिर नोकरीनंतरही तुमचा पीएफ निधी सुमारे ८५ लाखांपर्यंतच पोहोचू शकतो आणि ग्रॅच्युइटीमध्ये आणखी १०-१२ लाखांची भर पडू शकते. मात्र आरामात निवृत्त होण्यासाठी आवश्यक असलेल्या २- २.५ कोटींपेक्षा हे जमलेले एकूण १ कोटी आहे कमीच असतात.

गैरसमज ३: 'निवृत्तीनंतर खर्च कमी होतो' (Expenses reduce after retirement) -

खर्च - विशेषतः वैद्यकीय खर्च अनेकदा वाढतो. ६० वर्षांच्या आरोग्य विम्याचा प्रीमियम ५ लाखांच्या मूलभूत कव्हरसाठी दरवर्षी २५,०००- ते ५०,००० रूपयांच्या दरम्यान असू शकतो. त्यापलीकडे आयआरडीएआय (IRDAI) डेटा दर्शवितो की निवृत्तीनंतरचा वैद्य कीय खर्च दरवर्षी १ लाखांपेक्षा जास्त असू शकतो. आरोग्य सेवे तील महागाई सरासरी ७-९% आहे. याव्यतिरिक्त निवृत्त घेतलेले जीवनशैली, प्रवास आणि कधीकधी घराच्या नूतनीकरणावर अशा विविध गोष्टीवर अधिक खर्च करतात.

गैरसमज ४: निवृत्तीनंतर माझ्यावर आर्थिक जबाबदाऱ्या राहणार नाहीत ('I won't have Financial Responsibilities post retirement ')-

पुन्हा विचार करा. औद्योगिक अहवालांनुसार, ५२% भारतीय पालक त्यांच्या प्रौढ मुलांना आर्थिक मदत करत राहतात. बरेच जण नातवंडांच्या शिक्षणासाठी किंवा कौटुंबिक लग्नासाठी देखील सुद्धा योगदान देतात. या खर्चामुळे अचानक ५-१० लाख किंवा त्याहून अधिक रक्कमेची जावक (Outflow) वाढल्याने निधी बाहेर जातो.

अर्थसमज ५: ' निवृत्तीपूर्वी मी पुरेसे कमाई करेन ' (I Will earn enough before I retire') -

कमाई म्हणजे संपत्ती नाही. गुंतवणूक म्हणजे खरी संपत्ती, नियमित बँक खात्यात ४% दराने दरमहा १०,००० रुपये वाचवल्याने ३० वर्षांमध्ये ७० लाख रुपये परत मिळतात. १०% परतावा देणाऱ्या इक्विटी म्युच्युअल फंडात तीच रक्कम २.२६ कोटी उत्पन्न मिळवून देते. हा फरक आश्चर्यकारक आहे.

तयारी कशी करावी?

* एक साधी रचना आपल्याला मदत करू शकते: तुमच्या मासिक उत्पन्नाच्या १५-२०% पैशांची बचत करा

* तुमची बचत दरवर्षी १०% ने वाढवा

* विविधता आणा

o इक्विटी म्युच्युअल फंड (वाढ)

o राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस) (शिस्त)

o मुदत ठेवी (स्थिरता)

o आरोग्य विमा (संरक्षण)

o आपत्कालीन निधी - ६ ते१२ महिन्यांसाठी तरलता (Liquidity)

विलंबाची किंमत चुकवू नका !

निवृत्तीनंतर २ कोटी रुपये उभारण्यासाठी, तुम्ही जितकी जास्त वेळ वाट पहाल तितकी तुमची गुंतवणूक आवश्यकता लक्षणीयरीत्या वाढते.

* २५ पासून सुरुवात करा: ४,०००/ रूपये महिना

* ३५ पासून सुरुवात करा: ११,०००/ रूपये महिना

* ४० पासून सुरुवात करा: १८,०००/रूपये महिना

तुम्ही जास्ती गुंतवणूक करता आणि तरीही तोच परिणाम मिळवता यांचे कारण तुम्ही चक्रवाढीची (Compounding Returns)ची शक्ती गमावली.

निष्कर्ष (Conclusion)-

निवृत्ती अपरिहार्य आहे. तुम्ही ज्या प्रतिष्ठेने तो कालखंड जगता तो एक पर्याय आहे - आणि त्याची सुरुवात लवकर, शिस्तबद्ध नियोजनाने होते. आजपासून सुरुवात करा. कालची वेळ सर्वोत्तम होती. पुढचा वेळ आता सर्वोत्तम आहे.

Comments
Add Comment