
नंदुरबार : राजकारणात सत्तेच्या खुर्चीवर टिकायचं असेल, तर फक्त खेळी नाही…तर नशीबही लागत, असं राजकीय अभ्यासकांचं मत आहे. अशातच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेली विरोधकांच्या आरोपांच्या साडेसातीपासून मुक्ती मिळावी म्हणून मंत्री कोकाटे यांनी शनिदेवाच्या चरणी धाव घेतली आहे. राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. देशातील एकमेव शनि देवाचे साडेसाती मुक्त स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शनिमांडळ येथील शनी मंदिरात कोकाटे दर्शन घेऊन पूजा अर्चा केली असल्याचं समोर आलंय.

बेलापूर : ‘डावीकडून उजवीकडे वळा’, ‘पुढे सरळ जा’… हे सांगणारा गुगल मॅप (Google Map) यावेळी प्राणघातक ठरला! बेलापूरमध्ये एका वाहनचालकाने गुगल मॅपवर दाखवलेला ...
माणिकराव कोकाटे शनी मंदिरात जाऊन शनि देवाची विधिवत पूजा करत विरोधकांच्या साडेसातीतून मुक्ती मिळावी म्हणून या साडेसाती मुक्ती ठिकाणाला भेट देत आहेत. शनिवारी शनि देवाची साडेसाती मुक्ती ठिकाणी पूजा केल्याने मागे लागलेली इडा पिडा दूर होत असल्याची भाविकांची भावना आहे. शेतकऱ्याबाबत केलेलं वक्तव्य किंवा विधीमंडळात रमी खेळतानाचा त्यांचा व्हायरल व्हिडीओ असेल, यामुळे ते विरोधकांच्या भोवऱ्यात अडकले आले आहेत. त्यांच्यावर आरोपांची राळ उडवली जात आहे, तर त्यांचा राजीनामा घेतला जाण्याची दाट शक्यता देखील वर्तवली जात आहे. कारण मंगळवारी त्या संदर्भात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच आपल्या मागची इडा पिडा टळावी यासाठी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आता शनिदेवाला साकडं घातलं आहे, त्याचबरोबर शनी मंदिरात कोकाटे दर्शन घेऊन पूजा अर्चा करणार असल्याचं समोर आलं आहे. लवकरच कोकाटेंच्या राजीनाम्याबाबतचं चित्र स्पष्ट होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.