
फडणवीस - शाह भेटीत काय घडलं?
नवी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ होण्याचे संकेत मिळताहेत. त्याला कारण ठरतंय ते मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीवारी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या 'सदिच्छा भेट'ची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगलीय. ही भेट केवळ औपचारिक होती का ? की मंत्रिमंडळातील मोठ्या बदलांची नांदी? की पडद्यामागची खेळी? या लेखातून जाणून घेऊया या भेटीमागचं खरं कारण आणि महायुतीचा पुढचा गेम प्लॅन.
?si=k0iy7gPPPsgdu9sp
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दिल्लीवारीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडालीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि या भेटीनं मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधाण आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची दिल्लीत बंद दाराआड २५ मिनिटं खलबतं झाली. यात महायुतीतील मित्रपक्षांमधील तणाव, मंत्र्यांची कामगिरी आणि त्यांच्या खात्यांचा आढावा घेतला गेला. महायुतीतील काही मंत्र्यांवरील टीका आणि आरोपांमुळे त्यांची हकालपट्टी किंवा खातेबदल करण्याचा विचार सुरू आहे. यात संजय शिरसाट, संजय राठोड, योगेश कदम आणि माणिकराव कोकाटे यांची नावं चर्चेत असल्याची सूत्रांची माहिती आहे. महायुतीमध्ये शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात अंतर्गत स्पर्धा आणि असंतोष आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ येत असताना अंतर्गत वाद निर्माण होऊ न देणं ही महायुतीची नीती आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्याला केवळ सदिच्छा दौरा असल्याचं म्हटलंय, मात्र फडणवीस यांचा दौरा हा मंत्रिमंडळातील फेरबदलाचे संकेत देण्यासाठीच असल्याचे राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. काहीही असलं तरी स्थानिक निवडणुका जवळ येत असताना जनतेचा विश्वास संपादन करणं आणि पक्षाची ताकद वाढवणं हा मुख्यमंत्री फडणवीसांचा मुख्य अजेंडा आहे. राजकारणाबरोबरच या भेटीत विकास प्रकल्पांवरही चर्चा झाली. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील एका मोठ्या रासायनिक कारखान्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवलाय. त्यामुळे राज्यात औद्योगिक विकास आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. फडणवीस यांनी याला विकास आणि राजकारण यांचा सुवर्णमध्य असल्याचं म्हटलंय.

नवी दिल्ली : देशात प्रथमच हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनची यशस्वी ट्रायल पार पडली आणि भारतीय रेल्वेने अक्षरशः इतिहास रचला. रेल्वे सेवेत आता क्रांतीकारक ...
दरम्यान, २०२२ पासून ओबीसी आरक्षणाच्या खटल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. मात्र आता या निवडणुका जवळ येत आहेत. त्यातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी दोन दशकांनंतर एकाच मंचावर येऊन राजकीय वातावरण तापवलंय. त्यामुळे महायुतीला आपला गेम प्लॅन नव्याने आखावा लागणार आहे. फडणवीस यांच्यासमोर मित्रपक्षांना एकत्र ठेवण्याचं आणि जनतेला विकासाचं स्वप्न दाखवण्याचं आव्हान आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपला राजकीय अनुभव आणि अमित शहा यांच्याशी जवळीकतेने महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. मुख्यमंत्री या नात्याने त्यांना शिवसेना आणि राष्ट्रवादी या मित्रपक्षांना विश्वास दाखवलाय. मंत्रिमंडळ फेरबदल, विकास प्रकल्प आणि निवडणुकीच्या तयारीत फडणवीस यांची ही खेळी महायुतीला यश मिळवून देणारी आहे. मुख्यमंत्री फडणवीसांची भेटीमागची रणनीती येणाऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात अनेक चेहरे बदलवणारी ठरू शकते. त्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलात कुणाला संधी मिळणार आणि कुणाला डच्चू मिळणार, कोणती उलथापालथ होणार, हे फडणवीसांच्या मास्टरस्टोकमुळे काही दिवसांत स्पष्ट होईल.