Tuesday, August 26, 2025

नवी मुंबईच्या घणसोलीत इमारतीचा स्लॅब कोसळला, महिला जखमी

नवी मुंबईच्या घणसोलीत इमारतीचा स्लॅब कोसळला, महिला जखमी
घणसोली : नवी मुंबईच्या घणसोलीत इमारतीचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत महिला जखमी झाली. घणसोलीतील सेक्टर सातमध्ये सिम्पलेक्स ओम साई सोसायटी मधील एफ तीन इमारतीतल्या ३०७ क्रमांकाच्या घरात किचनचा स्लॅब कोसळला. जेव्हा स्लॅब कोसळला त्यावेळी एक महिला किचनमध्ये होती. ही महिला जखमी झाली. स्लॅबचा भाग अंगावर पडल्यामुळे महिलेच्या डोक्याला आणि एका हाताला दुखापत झाली. नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली तसेच जखमी महिलेला नियमानुसार मदत देण्याचे आश्वासन दिले. ज्या घरात स्लॅब कोसळला त्या घरात बांदल कुटुंब दहा वर्षांपासून वास्तव्यास आहे. इमारत जुनी झाल्याचे त्यांनी मान्य केले. पण स्लॅब कोसळेल असे त्यांना कधी वाटले नव्हते. घडलेल्या घटनेने घरातील सदस्य घाबरले आहेत. स्लॅब कोसळण्याची घटना ज्या इमारतीत घडली ती इमारत जुनी असली तरी धोकादायक स्थितीत नाही. यामुळे स्लॅब कोसळल्याचे कळल्यापासून इमारतीतले अनेक रहिवासी घाबरले आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा