
नवी दिल्ली : देशात प्रथमच हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनची यशस्वी ट्रायल पार पडली आणि भारतीय रेल्वेने अक्षरशः इतिहास रचला. रेल्वे सेवेत आता क्रांतीकारक बदल होण्याची शक्यता आहे. चेन्नई येथील इंटीग्रल कोच फॅक्ट्रीत देशातील हायड्रोजनवर चालणाऱ्या पहिल्या ट्रेनची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशवासियांसाठी ही मोठी बातमी दिली आहे. या यशस्वी चाचणीमुळे हायड्रोजनवर रेल्वे धावण्याचा मार्ग आता मोकळा झालाय, असं रेल्वे मंत्र्यांनी म्हटलंय.
काय म्हणाले रेल्वेमंत्री?
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर (X) पोस्ट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये या ट्रेनमधील कोच टेस्टचा व्हिडीओ शेअर केला आहे. हायड्रोजनवर चालणाऱ्या पहिल्या कोच (ड्रायव्हिंग पॉवर कार)च्या ICFची चेन्नईत यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. भारत १२०० एचपी हायड्रोजन ट्रेन विकसित करत आहे, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आला आहे आणि थोड्याच वेळात मोठा स्फोट होणार असा धमकीचा फोन आला आहे. शुक्रवारी मुंबई पोलिस ...
काय आहे खास?
या कोचला ड्रायव्हिंग पॉवर कारच्या नावाने ओळखले जाते. हरित ऊर्जा आणि भविष्यातील परिवहन सेवेसाठीचे नवीन पर्याय निर्माण करण्यासाठी भारत नेहमीच वचनबद्ध राहिला आहे, असं वैष्णव यांनी म्हटलंय.
First Hydrogen powered coach (Driving Power Car) successfully tested at ICF, Chennai.
India is developing 1,200 HP Hydrogen train. This will place India among the leaders in Hydrogen powered train technology. pic.twitter.com/2tDClkGBx0
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) July 25, 2025
यात वेगळं काय?
डीझेल आणि विजेवर चालणाऱ्या ट्रेनची तुलना केल्यास हायड्रोजनवर चालणारी ट्रेनही पर्यावरण पूरक आहे. या ट्रेनमधून धूर येत नाही आणि कार्बन डायऑक्साईडही सोडला जात नाही. त्यामुळे प्रदूषणाला आळा बसतो. ही ट्रेन हायड्रोजन फ्यूल सेल तंत्रज्ञानावर काम करते. यात हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजनच्या प्रक्रियेतून एनर्जी निर्माण होते.