आजी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या!

  94

सध्याच्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी आजी विद्यार्थ्यांपेक्षा माजी विद्यार्थ्यांचे फार लाड केले जातात. माजी विद्यार्थ्यांना संकुलनामध्ये स्वतंत्रपणे खोली देऊन त्यांच्या विश्रांतीची सोय केली जाते. मात्र काही ठिकाणी आजी विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे अभ्यासकक्ष दिला जात नाही. तेव्हा हे चित्र बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी अध्यापकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला हवा. आजी विद्यार्थ्यांचा अभ्यासातील आत्मविश्वास वाढण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांच्या चुका सुधारण्यासाठी त्यांना संधी दिली गेली पाहिजे. त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी अचूक मार्गदर्शन केले पाहिजे. तुला काही येत नाही किंवा तुझ्या भावाला काहीही विषय समजत नाही. तो प्रश्नांची उत्तरे काहीही लिहितो. वर्गात बोलत नाही तो शिक्षण घेऊन काय करणार असे अनेक प्रश्न उपस्थित करत बसण्यापेक्षा अध्यापकांनी आपण उत्तम प्रकारे अध्यापन कसे करू शकतो याचा विचार करावा. तेव्हा विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यापेक्षा मी ज्या विषयाचे अध्यापन करीत आहे त्या विषयाचे अध्यापन करण्याला आपण पात्र आहोत काय? याचे उत्तर अध्यापकांना शोधावे लागेल. तसेच महत्त्वाची बाब म्हणजे माजी विद्यार्थ्यांपेक्षा आजी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविला पाहिजे.


विद्यार्थ्यांचा वर्ग एक जरी असला तरी वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेले विद्यार्थी असतात. ते एकमेकांचे ओळखीचे सुद्धा नसतात. काहीना तर राहायची सुद्धा सोय नसते. त्यात घरची आर्थिक परिस्थिती साथ देत नाही अशा अनेक समस्या विद्यार्थ्यांसमोर असतात. त्यात आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक लाभ कसा देता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करावा. म्हणजे त्यांचे ध्येय गाठण्यासाठी त्यांच्या चुका कमी करून योग्य संधी द्यायला हवी. अध्यापकांनी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला हवा. विद्यार्थी आहेत म्हणून आपण आहोत याची जाणीव निर्माण व्हायला हवी. असेच अध्यापक चांगले विद्यार्थी घडवू शकतात. काही ठिकाणी आजही असे वातावरण पाहायला मिळत नाही. महत्त्वाची बाब म्हणजे, अध्यापकांना विद्यार्थ्यांच्या चुका लक्षात आल्यावर तो विद्यार्थी अशा चुका का करतो? याविषयी त्याच्याशी प्रत्यक्ष चर्चा करा. चर्चा करताना तो नाराज होणार नाही याची काळजी घ्या. त्याने एखादे चांगले काम केल्यास त्याचे तोंडभरून कौतुक करा. नक्कीच त्यांचा आत्मविश्वास वाढेल. तो चुका करीत असेल तर तुला चहा की कॉफी देऊ असे विचारण्यापेक्षा तो वारंवार का चुका करतो याचे उत्तर स्वत: शोधून अचूक मार्गदर्शन करावे लागेल. मात्र त्यांच्या मनात भीती निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. अध्यापकांनी अध्यापन करीत असताना संदर्भासाठी कोणकोणत्या पुस्तकांचे वाचन केले त्या लेखकांनी कोणकोणती उदाहरणे सांगितली आहेत ते संदर्भासहित विद्यार्थ्यांना सांगावे. योग्य ठिकाणी उदाहरणे द्यावीत. जेणेकरून संकल्पना समजण्यात अधिक मदत होऊ शकते.


एकदा का संकल्पना समजली की पुढील अध्यापन समजायला सोपे जाते. अशावेळी विद्यार्थ्यांकडून काही सूचना येतात काय याचीही अप्रत्यक्षपणे वाट पाहावी. यासाठी अध्यापकांना वर्गात अध्यापनाच्या दृष्टिकोनातून पोषक वातावरण निर्माण करावे लागेल. ‘ध’ चा ‘म’ न करता चुका समजून त्या दुरुस्त करून आदर्श विद्यार्थी कसे घडविता येतील त्या दृष्टीने प्रयत्न करावा. बऱ्याचवेळा विद्यार्थ्यांच्या समोर अनेक समस्या निर्माण होत असतात तेव्हा अशावेळी विद्यार्थ्यांनी खचून न जाता त्यावर मात करून पुढे कसे जाता येईल त्यादृष्टीने मार्ग काढावा. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिद्द निर्माण होत असते. काहीवेळा विद्यार्थ्यांचे ध्येय समजून घेऊन त्यात तो कसा यशवंत होईल त्याप्रकारे त्याला मदत करावी. अध्यापकांनी आपले अध्ययन चालू केल्यानंतर मागील दोन परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या विषयात किती गुण मिळाले याचा आढावा घ्यावा. अ, ब, क आणि ड श्रेणीत किती विद्यार्थी आहेत याची वर्गवारी तयार केल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रगती समजते. अशा वेळी ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले असतील त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या प्रगतीचा आलेख कसा उंचावता येईल तसा प्रयत्न करावा. म्हणजे त्यांचाही प्रगतीचा आलेख उंचावेल. यातूनच शिक्षणाची आवड निर्माण होऊन शिक्षणातील विद्यार्थ्यांचा आनंदी प्रवास सुरू होतो. महत्त्वाची बाब म्हणजे, विद्यार्थ्यांबरोबर पालकांना सुद्धा शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी अधूनमधून चर्चा करावी. जेणेकरून पालकसुद्धा आपल्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करू शकतात. त्यामुळे विद्यार्थी अधिक उत्साहाने शिक्षण घेण्यास प्रेरित होतील. असे असले तरी शैक्षणिक संकुलनामध्ये आजी मुलींना व मुलांसाठी स्वतंत्र अभ्यास कक्ष असणे गरजेचे आहे. तरच आजी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून त्यांचे शैक्षणिक उद्दिष्ट साध्य करून आपले ध्येय सहज पार करू शकतात.


अलीकडे माजी विद्यार्थ्यांचा एक संघ तयार होताे. त्यांच्या आर्थिक सहकार्याने शैक्षणिक संकुलनातील अनेक विकासकामे हाती घेतली जात आहेत. तेव्हा माजी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्यासाठी आजी विद्यार्थी चांगले घडवले पाहिजेत. त्या दृष्टीने अध्यापकांनी अध्यापनाचे चांगले काम केले पाहिजे. अध्यापकांनी हसत-खेळत विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन अध्यापनात त्यांचा उत्साह कसा वाढेल व चांगले विद्यार्थी कसे घडविता येतील त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. त्यांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे.

Comments
Add Comment

खड्ड्यांच्या शापातून रस्त्यांना मुक्ती कधी?

कोणत्याही कामाचे योग्य प्रकारे नियोजन केले तर त्याची दुरवस्था होत नाही. विशेषत: राज्यातील रस्त्यांच्या

धार्मिक, ऐतिहासिक वारसा लाभलेले पालघर

कोकणच्या उत्तर भागात पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगा, पश्चिमेकडे अरबी समुद्रा दरम्यान पसरलेला आहे. पालघर

ओझोनमुळे कोंडला महानगरांचा श्वास

उन्हाळ्यात प्रमुख महानगरांमध्ये जमिनीजवळील ओझोन प्रदूषण लक्षणीयरीत्या वाढले. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या

दुसरं लग्न करताय? सावध राहा!!

मीनाक्षी जगदाळे आपल्या समाजरचनेत दिवसेंदिवस जे चुकीचे बदल घडत आहेत, विवाहबाह्य संबंध, त्यातून गुन्हेगारीचा उदय

मग बॉम्बस्फोट केले कोणी?

शंतनु चिंचाळकर दहशतवाद्यांनी मुंबईची लाईफलाईन असलेल्या सात लोकल ट्रेनमध्ये प्रेशर कुकरच्या साह्याने

सुरक्षेसाठी विमा: शेतकऱ्यांच्या न ये कामा..

ग्राहक पंचायत : मधुसूदन जोशी कल्लाप्पा हा अल्पभूधारक शेतकरी. आपल्या एकरभर शेतातून कुटुंबाच्या रोजच्या कौटुंबिक