Thursday, October 23, 2025
Happy Diwali

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दि. २७ जुलै २०२५ रोजी आपल्या उपनगरी विभागांवर विविध अभियांत्रिकी व आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक परिचालीत करणार आहे. ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर ११.०० ते १६.०० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे, तर मुलुंड स्थानक येथून १०.४३ ते १५.५३ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या /अर्धजलद ट्रेन, मुलुंड ते कल्याण दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकांवर थांबतील आणि आपल्या निर्धारित वेळेपेक्षा सुमारे १० मिनिटे उशिरा पोहोचतील.

कल्याण येथून १०.३६ ते १५.५१ पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या/अर्ध जलद ट्रेन, कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवल्या जातील. या ट्रेन्स डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकावर अप धिम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा पोहोचतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ११.०० ते १७.०० वाजेपर्यंत सुटणाऱ्या व तेथे येणाऱ्या सर्व अप व डाऊन धीम्या लोकल सेवा सुमारे १० मिनिटे उशिराने पोहोचतील/प्रस्थान करतील.

तसेच पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत आणि पनवेल येथे सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ५.०५ पर्यंत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन ब्लॉक राहील. पनवेल येथून १०.३३ ते १७.०७ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०९.४५ ते १५.४४ पर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येतील.

पनवेल येथून ११.०२ ते १६.२६ पर्यंत ठाणेकडे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून १०.०१ ते १६.२४ पर्यंत पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील ट्रेन रद्द राहतील. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वाशी विभागात विशेष लोकल सेवा चालवल्या जातील.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >