Mumbai Airport : “थोड्याच वेळात धमाका होणार!” मुंबई एअरपोर्टला धमकीचे ३ कॉल; सुरक्षा यंत्रणांची धाबे दणाणली!

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आला आहे आणि थोड्याच वेळात मोठा स्फोट होणार असा धमकीचा फोन आला आहे. शुक्रवारी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला एकामागोमाग ३ वेगवेगळ्या क्रमांकांवरून धमकीचे फोन आले, ज्यामुळे सगळी खळबळ उडाली. या कॉलनंतर, मुंबई पोलिसांचे पथक तातडीनं सतर्क झाले आणि पोलिस अधिकारी, तसेच बॉम्ब शोध पथकाने विमानतळ गाठलं. प्रत्येक तास सखोल शोध घेऊन मोहीम राबवण्यात आली, मात्र एअरपोर्टवर कुठेही, काहीच संशयास्पद आढळून आलेलं नाही.


पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळाच्या टर्मिनल २ वर एका अज्ञात व्यक्तीने बॉम्बस्फोटाची धमकी दिली होती. माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे उच्च अधिकारी आणि बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी दाखल झाले. एअरपोर्टचा संपूर्ण परिसर खाली करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक कोपऱ्याची, सखोल, बारकाईने तपासणी करण्यात आली. मात्र पोलिस व बॉम्बशोधक पथकाला कुठेच, काहीही संशयास्पद आढळलं नाही. त्यामुळे बॉम्बची ही केवळ अफवा असल्याचं दिसून आलं.



आसाम-बंगाल सीमेशी सक्रिय असलेले कॉल


प्राथमिक तपासामध्ये असं दिसून आलंय की, हे धमकीचे कॉल आसाम आणि पश्चिम बंगाल सीमेजवळ सक्रिय असलेल्या मोबाईल नंबरचा वापर करून केले गेले होते. मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी अज्ञात कॉलरविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास तात्काळ सुरू केला. सध्या, पोलिस संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. धमकी देणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याचे हेतू शोधता येतील यासाठी तपास सुरू आहे.


Comments
Add Comment

उमेदवारी अर्ज, प्रचार रथ, झेंडे आणि प्रचार साहित्यांची खरेदी आणि उबाठाने कापला पत्ता...

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : वडाळ्यातील माजी नगरसेवक अमेय घोले यांनी उबाठाला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश

भांडुप बेस्ट अपघात प्रकरणी बेस्टतर्फे चौकशी

मृतांना बेस्ट तर्फे २ लाख,र मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत मुंबई : सोमवारी रात्री भांडुप पश्चिम या

आज मध्यरात्री उशिरापर्यंत धावणार 'मेट्रो १'

मुंबईकरांना इच्छितस्थळी जाणे सुकर होणार मुंबई : घाटकोपर,वर्सोवा,अंधेरी मेट्रो-१ मार्गिकेवरील सेवा उद्या

१ ते ३१ जानेवारी दरम्यान राज्यात ‘रस्ता सुरक्षा अभियान’

मुंबई : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती

मतदानाच्या दिवशी, १५ जानेवारी रोजी भरपगारी सुट्टी

मुंबई : राज्यातील सर्व सरकारी,निमसरकारी आणि खासगी आस्थापना मधील सर्व कर्मचाऱ्यांना यंदाची संक्रात पावली आहे. १५

महानगरपालिका आयुक्तांनी निवडणूक प्रशिक्षण केंद्रांची केली पाहणी

लोअर परळ आणि कांदिवली प्रशिक्षण केंद्रांना दिली भेट मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा