भारताच्या पोरींची कमाल, FIDE बुद्धिबळ वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताच्या कोनेरू हम्पी-दिव्या देशमुख यांच्यात लढत

मुंबई : FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषकाचे विजेतेपद भारताच्यात खात्यात दाखल होणार आहे. FIDE बुद्धिबळ वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताच्या कोनेरू हम्पी-दिव्या देशमुख यांच्यात लढत रंगणार आहे. त्यामुळे कोणीही जिंकले तरीही भारताच्याच खात्यात हे विजेतेपद मिळणार आहे.

गुरूवारच्या सेमीफायनलम्ये भारताच्या कोनेरू हम्पीने चीनच्या टिंगजी लेई हिला टायब्रेकमध्ये हरवले. सामन्याचे सुरूवातीचे दोन डाव ड्रॉ झाले. त्यानंतर टायब्रेकरमध्येही दोघांनी १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर १०-१० मिनिटांच्या गेममध्ये चीनच्या लेईने पहिला डाव जिंकत सरशी घेतली. मात्र हम्पीनेही दुसरा डाव जिंकत पुन्हा बरोबरी गाठली. त्यानंतर टायब्रेकर सेटमध्ये हम्पीने पहिला डाव जबरदस्त पद्धतीने जिंकला. त्यानंतरचाही डाव हम्पीने जिंकत अंतिम फेरी गाठली.

याआधी दिव्या देशमुखने गाठली अंतिम फेरी


महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक देणारी नागपूरची दिव्या देशमुख पहिली भारतीय ठरली आहे. दिव्याने माजी विश्वविजेती चीनची मातब्बर खेळाडू टॅन झोनग्यी हिला पराभूत केले.



 

यासह या दोनही महिला खेळाडूंनी महिला ‘कॅंडिडेट्स’ स्पर्धेमध्ये आपले स्थान मिळवले आहे.
Comments
Add Comment

हर्षित राणाची जागा जाणार? टीम इंडियात आणखी एका खेळाडूचे पुनरागमन !

मुंबई : टीम इंडियामध्ये आणखी एक वरिष्ठ खेळाडू संघात परतण्याच्या तयारीत असून, त्याच्या पुनरागमनामुळे मुख्य

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरची प्रकृती सुधारतेय: भारतात कधी परतणार?

ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पुन्हा एकदा दुखापतीच्या संकटात सापडला आहे. नुकताच

भारत - ऑस्ट्रेलिया पहिला T20 सामना २९ ऑक्टोबरला, पहा टीम इंडियाची संभाव्य Playing XI

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव झाला. ही मालिका ऑस्ट्रेलियाने २-१

बाईपण भारी देवा ! ७ महिन्यांची गरोदर तरीही १४५ किलो वजन उचलत जिंकली वेटलिफ्टिंग स्पर्धा

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नसत फक्त जिद्द असायला हवी . दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे सिद्ध

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन

श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर

गंभीर दुखापतीनंतर प्रकृती स्थिर मुंबई  : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर याची प्रकृती अद्यापही