Thursday, October 2, 2025

भारताच्या पोरींची कमाल, FIDE बुद्धिबळ वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताच्या कोनेरू हम्पी-दिव्या देशमुख यांच्यात लढत

भारताच्या पोरींची कमाल, FIDE बुद्धिबळ वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताच्या कोनेरू हम्पी-दिव्या देशमुख यांच्यात लढत
मुंबई : FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषकाचे विजेतेपद भारताच्यात खात्यात दाखल होणार आहे. FIDE बुद्धिबळ वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताच्या कोनेरू हम्पी-दिव्या देशमुख यांच्यात लढत रंगणार आहे. त्यामुळे कोणीही जिंकले तरीही भारताच्याच खात्यात हे विजेतेपद मिळणार आहे. गुरूवारच्या सेमीफायनलम्ये भारताच्या कोनेरू हम्पीने चीनच्या टिंगजी लेई हिला टायब्रेकमध्ये हरवले. सामन्याचे सुरूवातीचे दोन डाव ड्रॉ झाले. त्यानंतर टायब्रेकरमध्येही दोघांनी १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर १०-१० मिनिटांच्या गेममध्ये चीनच्या लेईने पहिला डाव जिंकत सरशी घेतली. मात्र हम्पीनेही दुसरा डाव जिंकत पुन्हा बरोबरी गाठली. त्यानंतर टायब्रेकर सेटमध्ये हम्पीने पहिला डाव जबरदस्त पद्धतीने जिंकला. त्यानंतरचाही डाव हम्पीने जिंकत अंतिम फेरी गाठली.

याआधी दिव्या देशमुखने गाठली अंतिम फेरी

महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक देणारी नागपूरची दिव्या देशमुख पहिली भारतीय ठरली आहे. दिव्याने माजी विश्वविजेती चीनची मातब्बर खेळाडू टॅन झोनग्यी हिला पराभूत केले.   यासह या दोनही महिला खेळाडूंनी महिला ‘कॅंडिडेट्स’ स्पर्धेमध्ये आपले स्थान मिळवले आहे.
Comments
Add Comment