Saturday, October 25, 2025
Happy Diwali

स्वरा भास्करला फहाद अहमदशी लग्न केल्याचा पश्चाताप? 'पती पत्नी और पंगा' शोमधील वक्तव्यामुळे चर्चा!

स्वरा भास्करला फहाद अहमदशी लग्न केल्याचा पश्चाताप? 'पती पत्नी और पंगा' शोमधील वक्तव्यामुळे चर्चा!

मुंबई : अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मुस्लिम मुलाशी लग्न केल्यापासून ते लग्नाच्या दिवशी सरकारी कार्यालयात ढोल वाजवण्यापर्यंत, स्वरा नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे प्रकाशझोतात राहिली आहे. आता कलर्स टीव्हीच्या आगामी रिॲलिटी शो 'पती पत्नी और पंगा' मधील तिच्या वक्तव्याने ती पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे.

लग्नानंतर ग्लॅमर दुनियेपासून काहीशी दूर असलेली स्वरा भास्कर पती फहाद अहमदसोबत पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येत आहे. या शोचा नुकताच प्रदर्शित झालेला प्रोमो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

मुनव्वर फारुकी आणि सोनाली बेंद्रे होस्ट करत असलेल्या 'पती पत्नी और पंगा' या बहुप्रतिक्षित शोमध्ये स्वरा आणि फहाद यांचा प्रोमो लक्ष वेधून घेत आहे. या प्रोमोमध्ये स्वरा ढोल वाजवत धमाकेदार एंट्री करताना दिसते. त्यावेळी फहाद अहमद मिश्किलपणे म्हणतो की, "हिला ढोलशी इतकं प्रेम आहे की, लग्नाच्या वेळी तिने सरकारी कार्यालयात ढोल वाजवला, ज्यामुळे लग्न लावणाऱ्या अधिकाऱ्याची बदली झाली."

पतीची ही तक्रार ऐकून स्वरा लगेच म्हणते, "हा तर भांडण करण्याच्या मूडमध्ये आहे आणि आता मला वाटतंय की इथे येऊन मी चूक केली." यावर फहाद पुन्हा "तुम्ही लोक इथे मला शांत बसू देऊ नका," असे म्हणतो. स्वरा पुन्हा एकदा जोर देऊन म्हणते, "मी मोठी चूक केली."

स्वराच्या या वक्तव्यामुळे तिला फहाद अहमदसोबत लग्न केल्याचा पश्चाताप होत आहे का, अशा चर्चांना उधाण आले आहे. अर्थात, हे केवळ एका रिॲलिटी शोमधील विनोदी अंदाजात केलेले वक्तव्य आहे की यात काही तथ्य आहे, हे शो प्रदर्शित झाल्यावरच स्पष्ट होईल.

'पती पत्नी और पंगा' या शोमध्ये स्वरा-फहाद व्यतिरिक्त अविका गौर तिचा होणारा नवरा मिलिंद चांदवानीसोबत, हिना खान तिचा पती रॉकी जयसवालसोबत आणि गुरमीत चौधरी पत्नी देबिना बॅनर्जीसोबत सहभागी होणार आहेत. या सर्व जोडप्यांचे प्रोमो प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांमध्ये या शोबद्दल उत्सुकता वाढली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा