चीनमध्ये वादळाचा कहर! हेबेई प्रांतात विध्वंसक पूर, संपूर्ण शहर पाण्याखाली

  65

बीजिंग: सध्या संपूर्ण भारतात मान्सून बरसत असून, अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे भुस्खलन, पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण केवळ भारत नव्हे तर आपल्या शेजारील देशांमध्ये देखील पावसाने चांगलाच धुमाकूळ घातलेला दिसून येत आहे. काल गुरुवारी दिनांक २४ जुलै २०२५ रोजी चीनमधील उत्तरेकडील बाओडिंग शहरात एका तीव्र वादळाने कहर केला. येथे २४ तासांत ४४७.४ मिमी पाऊस पडला. जो या शहराच्या सरासरी वार्षिक पावसाच्या जवळपास ५०० मिमी आहे. या असाधारण पावसामुळे बाओडिंग आणि आसपासच्या हेबेई प्रांतात प्रचंड पूर आणि विध्वंस झाल्याची बातमी समोर येत आहे. 

काही तासांच्या मुसळधार पावसामुळे चीनच्या बाओडिंग शहराची नागरी व्यवस्था कोलमडून पडली आहे. बाओडिंग चीनची राजधानी बीजिंगपासून फक्त १६० किलोमीटर अंतरावर आहे. चीनच्या हेबेई प्रांतातील बाओडिंग शहरात एका दिवसात एक वर्षाचा पाऊस पडला असल्याचे बोलले जात आहे. या पावसामुळे संपूर्ण बाओडिंग शहर पाण्याखाली गेले आहे आणि हजारो लोक या पुरजन्य परिस्थितीमध्ये अडकले आहेत. दरम्यान, हजारो लोकांना वाचवण्यात आले असून त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.

चीनच्या बचाव संस्थांनी ६,१७१ घरांमधून सुमारे १९,४५३ लोकांना बाहेर काढले आहे. त्यांना सध्या पावसाच्या प्रभावापासून दूर सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. चीनच्या झुओझोऊ सारख्या भागात, जे २०२३ मध्ये पुरामुळे प्रभावित झाले होते, पावसामुळे अनेक रस्ते आणि पूल बंद पडले होते. चीन हवामान प्रशासनाने (सीएमए) पूरग्रस्त रस्त्यांवर काम करणाऱ्या पोलिसांचे फोटो शेअर केले आहेत.

पूर्व आशियाई मान्सूनमुळे मुसळधार पाऊस

झुओझोऊ हे बाओडिंगमधील एक लहान शहर आहे. जिथे एकाच रात्री १९० मिमी इतका पाऊस पडला आहे. स्थानिक हवामान खात्यानुसार वाढत्या पावसाचा संबंध हवामान बदल आणि पूर्व आशियाई मान्सूनच्या तीव्रतेशी जोडला आहे. गेल्या वर्षी हेबेईमध्ये २६.६% जास्त पाऊस पडला. चीनच्या हवामान विभागाने असा अहवाल दिला आहे की २०२० पासून या प्रदेशात एकूण पाऊस सरासरीपेक्षा सातत्याने जास्त झाला आहे, जो स्थानिक हवामान पद्धतीत नाट्यमय बदल दर्शवितो.

काही शास्त्रज्ञ चीनच्या पारंपारिकपणे कोरड्या उत्तरेकडील प्रदेशात या मुसळधार पावसाचा संबंध जागतिक तापमानवाढीच्या परिणामांशी जोडतात. शुक्रवारी सकाळपर्यंत, बाओडिंग अधिकाऱ्यांनी पुढील मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. हेबेई आणि आसपासच्या प्रांतांनी पूर आणीबाणी आणखी वाढवली आहे.  कारण आठवड्याच्या शेवटपर्यंत पाऊस सुरू राहण्याची अपेक्षा आहे. बीजिंगमध्ये हंगामातील सर्वात जास्त पाऊस सुमारे १६० किलोमीटर अंतरावर असलेले बीजिंग देखील सध्याच्या पूर हंगामातील सर्वात जास्त पावसाला सामोरे जाणार आहे. येथील हवामान विभागाने शहराच्या डोंगराळ आणि खालच्या उपनगरांमध्ये अचानक पूर, भूस्खलन आणि इतर आपत्तींचा इशारा दिला आहे.

Comments
Add Comment

Pakistan Cloudburst : पाकिस्तानमध्ये प्रलय! ढगफुटी आणि पुरानं ४१ बळी, ५०० पर्यटक बेपत्ता

पाकव्याप्त काश्मीरमध्ये सहा जणांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त मुजफ्फराबाद : पाकिस्तानातील अनेक भागांवर मुसळधार

व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवर रशियाची बंदी

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांचे आदेश मॉस्को : गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रशियन अधिकाऱ्यांनी

अंतराळवीर शुभांशू शुक्ला मायदेशी परतल्यावर घेणार पंतप्रधान मोदींची भेट

वॉशिंग्टन : अंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (आयएसएस) मध्ये जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कॅप्टन शुभांशु शुक्ला हे

अमेरिकेत आणखी एका हिंदू मंदिरावर हल्ला

वॉशिंग्टन : अमेरिकेतील एका हिंदू मंदिरावर पुन्हा एकदा वांशिक द्वेषाच्या पार्श्वभूमीवर हल्ला करण्यात आला आहे. ही

पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनादरम्यान गोळीबार, ३ जणांचा मृत्यू आणि ६०हून अधिक जखमी

इस्लामाबाद: पाकिस्तान आज म्हणजेच १४ ऑगस्टला आपला ७९वा स्वातंत्रदिन साजरा करत आहे. या खास क्षणाला कराची शहरातील

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये एफ-१६ विमान पाडल्याच्या दाव्यावर अमेरिकेचे मौन

वॉशिंग्टन: भारत आणि पाकिस्तान यांच्यात ७ ते १० मे दरम्यान झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर' या ८८ तासांच्या संघर्षात