Friday, August 15, 2025

Stock Market : 'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: बाजारात धुळधाण! सेन्सेक्स ७२१.०८ व निफ्टी २२५.१० अंकांने कोसळला अस्थिरतेला तिलांजली का बाजारात शॉर्ट पोझिशन? जाणून घ्या सविस्तर विश्लेषण

Stock Market : 'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: बाजारात धुळधाण! सेन्सेक्स ७२१.०८ व निफ्टी २२५.१० अंकांने कोसळला अस्थिरतेला तिलांजली का बाजारात शॉर्ट पोझिशन? जाणून घ्या सविस्तर विश्लेषण

मोहित सोमण:आठवड्याच्या अखेरच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाची जोरदार घसरगुंडी झाली. अखेरच्या सत्रात आज सेन्सेक्स व निफ्टी मोठ्या अंकाने घसरल्याने बाजारात वाताहात झाली आहे. खासकरून बाजारात आठवड्याची अखेर म्हणून काही गुं तवणूकदारांकडून गुंतवणूकीचा पोझिशन शॉर्ट करण्याकडे कल असल्याची शक्यता असल्यानेही निर्देशांकात झालेली घसरण सेन्सेक्स अखेरच्या सत्रात ७२१.०८ अंकाने घसरल्याने सेन्सेक्स ८१४६३.०९ अंकावर स्थिरावला व निफ्टी ५० निर्देशांक २२५.१० अंकांने घसरत २४८३७.०० पातळीवर स्थिरावला. आज सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकानेही जोरदार आपटी खाल्ली आहे. त्यामुळेच निर्देशांकात घसरण झाल्याने बँक सेन्सेक्स ४९८.६८ अंकाने व बँक निफ्टी ५२७.१५ अंकाने घसरला. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपम ध्ये अनुक्रमे १.४६%,१.८८% घसरण झाली. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.६१%,२.१०% घसरण झाली आहे.

निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात परिस्थिती वेगळी नाही. केवळ हेल्थकेअर (०.६९%) वगळता इतर सर्व क्षेत्रीय समभागात घसरण झाली आहे. सर्वाधिक घसरण मिडिया (२.६१%), पीएसयु बँक (१.७०%), रिअल्टी (०.९९%), मेटल (१.६४%), आयटी (१.४२%), खाजगी बँक (०.९७%), एफएमसीजी (०.९२%) समभागात मोठी घसरण झाली आहे. यामुळेच आज निर्देशांक पातळी तुटण्यास क्षेत्रीय निर्देशांक कारणीभूत ठरले आहेत. त्यात विशेष भर म्हणजे अस्थिरता निर्देशांकाने आज कहरच केला. वीआयएक्स अस्थिरता निर्देशां क (VIX Volatility Index) ५.१५% घसरल्याने आज बाजाराला सपोर्ट लेवल मिळू शकली नाही. या निर्देशांकातील सततच्या अस्थिरतेचा फटका निर्देशांकात बसला.

आज युएस बाजारातही महत्वाच्या घटना घडल्या आणि पुढेही घडण्याची शक्यता आहे. युएस फेड गव्हर्नर जेरोमी पॉवेल यांना काढण्याचा विचार नसून काढण्याची आत गरज नाही असे विधान केल्याने युएस बाजारात अस्थिरतेचे वातावरण कायम आहे. जरी अमे रिकेतील बाजारात निर्देशांकात वाढ होत असली तरी अतिरिक्त टेरिफ महसूलात वाढ झाल्याने नसून ती नुकत्याच केलेल्या जपानशी केवळ १५% टेरिफ लावून खेळी केल्याने झाली. रिटेल सेल्सचे आकडेही मागच्या वेळी समाधानकारक आल्याने बाजारातील गुंत वणूकदारांचे सेटींमेट वाढले तरी अजूनही अनिश्चितता कायम आहे. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या कार्यकाळातील अनिश्चितता गुंतवणूकदारांना अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेतील नेतृत्वात अकाली बदल झाल्यास बाजारातील संभाव्य प्रतिक्रियांचे मू ल्यांकन करण्यास प्रवृत्त करत आहे.

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॉवेलवर वारंवार अमेरिकन व्याजदरात पुरेशी कपात न केल्याबद्दल पुनः एकदा टीका जेरोमी पॉवेल यांच्यावर केली आहे. दहा महिन्यांत त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी त्यांना काढून टाकण्याची शक्यता त्यांनी वारंवार व्यक्त केली आहे, तसेच त्यांना काढून टाकणे 'अशक्य' असेल असेही म्हटले आहे त्यामुळे गुंतवणूकदारांना वाढीसाठी कुठलाच ट्रिगर न मिळता उलट बाजारात द्वंद्वाची वातावरण निर्मिती झाली आहे. वॉशिंग्टनमधील फेडरल रिझर्व्हच्या मुख्यालयाला भेट दिल्यानंतर गुरुवारी ट्रम्प म्हणाले की त्यांची पॉवेल यांच्याशी चांगली बैठक झाली त्यानंतर त्यांनी म्हटले की पॉवेल यांना काढून टाकणे आवश्यक नाही.

गुंतवणूकदार विविध परिस्थितींवर विचार करत आहेत, ज्यात ट्रम्प यांनी पॉवेल यांना काढून टाकणे, फेड प्रमुखांनी राजीनामा देणे किंवा पॉवेल यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी नवा उमेदवार नेमणे यांचाही समावेश आहे. अमेरिकेतील अर्थव्यवस्थेतील फंडांमेटल चां गले नसले तरी तात्पुरत्या अपेक्षेपेक्षा अधिक घसरलेल्या आलेल्या किरकोळ किंमत निर्देशांकानंतर बाजारात प्रामुख्याने मागील आठवड्यात वाढ सुरु झाली होती. ट्रम्प यांच्या टेरिफ वाढीनंतर महसूलात वाढ झाल्याने गुंतवणूकदार अधिक गुंतवणूक वाढवत आहे त. मात्र चीनशी भारताशी,इतर काही राष्ट्रांशी अद्याप एफटीए व्यापार न झाल्याने अस्थिरता कायमच आहे. दरम्यान ट्रम्प यांनी भारतीयांना युएसमधील आयटी कंपन्यांत नोकरी देऊ नये म्हणून कंपन्यांना बजावले आहे ज्याचे पडसाद भविष्यात उमटू शकतात. आ ता युएस व युके यांच्या कराराची व भारत युएस कराराची चर्चा सुरु झाल्याने पुन्हा तीव्र भावना व्यक्त करण्याची संधीही गुंतवणूकदारांना मिळाली आहे.

आजच्या अमेरिकेतील बाजारात सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.१८%), एस अँड पी ५०० (०.०७%), नासडाक (०.१८%) तिन्ही बाजारात वाढ झाली आहे. तर युरोपियन बाजारातील एफटीएसई (०.४०%), सीएससी (०.०६%), डीएएक्स (०.६६%) या तिन्ही बाजारात घसरण झाली आहे.आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टी संध्याकाळपर्यंत सपाट (Flat) स्थितीत असला तरी निकेयी २२५ (०.८७%), स्ट्रेट टाईम्स (०.२८%), तैवान वेटेड (०.०४%), हेगंसेंग (१.३६%), शांघाई कंपोझिट (०.३४%) बाजारात घसरण झाली आहे तर वाढ कोसपी (०.१८%), सेट कंपोझिट (०.३८%), जकार्ता कंपोझिट (०.३४%) बाजारात वाढ झाली. संभाव्य युएस युके यांच्यातील कराराच्या पार्श्वभूमीवर ही वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या WTI Futures निर्देशांकात ०.३२% वाढ झाली आहे. Brent Futures निर्देशांकात ०.३६% वाढ झाली आहे.

आज दिवसभरात सोन्याचा निर्देशांक मर्यादित पातळीवर राहिला होता. डॉलरच्या तुलनेत रुपयांत १२ पैशाने घसरण झाली असली तरी प्रामुख्याने जगातील घसरलेल्या सोन्याच्या मागणीमुळे निर्देशांक घसरले होते. भारतीय बाजारपेठेतही सोने स्वस्त झाले होते. सं ध्याकाळपर्यंत सोन्याच्या जागतिक गोल्ड फ्युचर निर्देशांकात (Gold Futures Index) यामध्ये ०.८३% अंकाने घसरण झाली. कच्च्या तेलाच्या (Crude Oil) तेलाच्या निर्देशांकात सकाळीच वाढ झाली होती. अखेरच्या सत्रात बीएसईत ४१५४ समभगापैकी १११६ समभागात वाढ झाली आहे तर २८९३ समभागात गुंतवणूकदारांना नुकसान झाले. एनएसईतील ३१३६ समभागातील ५९१ समभागात वाढ झाली आहे तर २२५२ समभागात गुंतवणूकदारांना नुकसान झाले. एनएसईत आज ९३ समभाग (Stocks) लोअर सर्किट व र कायम राहिले आहेत. कालच्या सत्रात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (Foreign Institutional Investors FII) एनएसईत २३०७ कोटींची रोख गुंतवणूक व बीएसईत २१३३.६९ कोटींची गुंतवणूक काढून घेतल्याने आजही बाजारातील तणाव कायम रा हिला. अस्थिरतेचा फटका संपूर्ण आठवड्यात कायम राहिल्याने या आठवड्यातील नुकसानीची आकडेवारी मोठी असू शकते.

अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ आयईएक्स (९.०६%), फिनिक्स मिल्स (५.३७%), होम फर्स्ट फायनान्स (४.४६%), सिप्ला (३.००%), टोरंट फार्मास्युटिकल (२.३८%), एसबीआय लाईफ इन्शुरन्स (२.१५%), अनंत राज (१.९७%), साई लाईफ (१.५७%),सुप्रीम इं डस्ट्रीज (१.६३%), अपोलो हॉस्पिटल (१.४३%), एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स (०.६७%), डिवीज (०.४२%), होंडाई मोटर्स (०.२१%), भारती एअरटेल (०.०९%) समभागात झाली.

अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण सीपीसीएल (९.७२%), इंटलेक्ट डिझाईन (९.२५%), एमआरपीएल (७.०९%), नुवामा वेल्थ (५.४२%),क्रिसील (५.०२%), बजाज फायनान्स (४.७१%), जेपी पॉवर वेचंर (४.६९%), जेएम फायनांशियल (४.६७%), झेन टेक्नॉलॉ जी (४.६६%), झी एंटरटेनमेंट (४.३९%),भेल (४.२९%), नेटवर्क १८ मिडिया (४.०७%), आयडीबीआय बँक (३.५७%), श्रीराम फायनान्स (३.६४%), वन ९७ (३.४७%), अदानी टोटल गॅस (३.२४%), इन्फोसिस (२.३७%), अदानी ग्रीन एनर्जी (४.३९%), अदानी एनर्जी सोल्यूशन (३.७६%), इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (२.८२%) जेएसडब्लू एनर्जी (२.७१%), मदर्सन (२.६३%), टेक महिंद्रा (२.४५%) समभागात झाली.

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले की,'आज आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने पोझिशन हलक्या करण्याकडे कल असतोच. तसेच मागील काही दिवसांपासून विदेशी गुंतवणूकदारां कडून विक्रीचा मारा सूरू आहे.याचाही काही टेरिफशी संबध आहे का हे समजून येत नाही. पण अजूनही टेरिफचे विषय संपत नाहीत. युके फ्रीट्रेडची बातमी बाजार तारू शकत नाही. त्यामुळे बाजार २४५०० ते २५००० करत कंसोलीडेशन करत आहे. बाजारात आज फक्त सनफार्मा मामुली वरती होता बाकी निर्देशांकाचे सर्व स्टाॅक खाली होते.कोणतीच रिस्क नको आहे. शनिवार रविवारमध्ये टेरिफची एखादी नकारात्मक बातमी नको हा हिशोब.बजाज फायनान्स बजाज फिनसर्व्ह वगैरे सर्व स्तरावर नफा वसूली करत नि फ्टी २४८३७ पर्यंत खाली आला.आज २२५ पूर्णांकाची तूट पहायला मिळाली.याचाच अर्थ आजही विदेशी गुंतवणूकदारांकडून भरपुर विक्री झालेली असणार.आज चौफेर विक्री जाणवत आहे. १ ऑगस्टपर्यंत टेरिफ अँग्रीमेंटची मुदत आठवड्यात संपेल पुढे काय हे प्रश्न आहेतच. या सर्व पार्श्वभूमीवर अजून एक आठवडा असाच बाजार हेलकावे खाणार का ते पहाणे महत्त्वपूर्ण आहे. आशा करू की या आठवडय़ात काहीतरी टेरिफ ची बातमी येऊन हा विषय संपेल.'

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'भारतीय शेअर बाजारांमध्ये आज मंदीचे सत्र दिसून आले, ज्याची सुरुवात २५०१० पातळीवर झाली - पहिल्याच टप्प्यात दिवसाचा उच्चांक नोंदव ला गेला. त्यानंतर निफ्टी सततच्या विक्रीच्या दबावाला बळी पडला आणि दिवसाच्या आत २४८०६ पातळीच्या नीचांकी पातळीवर परतला. मीडिया, ऊर्जा, तेल आणि वायू, सार्वजनिक क्षेत्रातील बँक, ऑटो आणि आयटी क्षेत्रांमध्ये स्पष्ट कमकुवतपणा दिसून आला. औषधनिर्माण क्षेत्रातील शेअर्स एकमेव तेजस्वी बिंदू म्हणून उभे राहिले, अन्यथा नकारात्मक परिस्थितीतही सापेक्ष लवचिकता दर्शविली. सततच्या घसरणीमुळे निफ्टीने २५००० पातळीच्या महत्त्वपूर्ण समर्थन क्षेत्राचा निर्णायकपणे भंग केला, ज्यामुळे आणखी घसर णीच्या जोखमीची चिंता निर्माण झाली. दुचाकी आणि तीन चाकी वाहनांमध्ये तसेच एमएसएमई विभागांमध्ये वाढलेल्या क्रेडिट खर्चामुळे बजाज फायनान्स विशेषतः दबावाखाली होता. ही घसरण वित्तीय क्षेत्रातील व्यापक असुरक्षितता दर्शवते आणि कर्ज देणाऱ्या बाजाराच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये चालू असलेल्या आव्हानांना अधोरेखित करते. एकंदरीत, बाजाराचा सूर खात्रीशीरपणे जोखीममुक्त होता, क्षेत्रीय प्रतिकूल परिस्थिती आणि निर्देशांकाच्या प्रमुख आधार पातळीतील खंडामुळे ते अधिक स्पष्ट झाले होते, जे सूचित करते की नजीकच्या काळात सावधगिरी बाळगली जाऊ शकते.'

आजच्या बाजारातील परिस्थितीवर जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की,'कॉर्पोरेट कंपन्यांचे निकाल मंदावले आणि जागतिक बाजारात मंदावलेले संकेत यामुळे देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये व्यापक विक्री झाली. लार्जकॅप शेअर्समधील वाढलेले मूल्यांकन आणि एफआयआयच्या महत्त्वपूर्ण नेट शॉर्ट पोझिशन्समुळे घसरणीचा दबाव वाढला. अमेरिका-भारत दर वाटाघाटींवरील अनिश्चितता आणि ईसीबीने यथास्थिती राखल्याने गुंतवणूकदारांच्या भावना नाजूक राहिल्या, व्या पारातील घडामोडींच्या चलनवाढीच्या परिणामांवर स्पष्ट अंतर्दृष्टी येईपर्यंत दर कपात पुढे ढकलण्यात आली. गेल्या २-३ महिन्यांतील मंदावलेल्या उत्पन्न हंगामामुळे आणि सततच्या एफआयआय विक्रीमुळे डीआयआयच्या गुंतवणूकीतील मंदावलेला प्रवाह सध्या च्या बाजारावर परिणाम करत आहे.'

आजच्या बाजारातील रूपयावर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,'कॉर्पोरेट कंपन्यांचे निकाल मंदावले आणि जागतिक बाजारात मंदावलेले संकेत यामुळे देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये व्यापक वि क्री झाली. लार्जकॅप शेअर्समधील वाढलेले मूल्यांकन आणि एफआयआयच्या महत्त्वपूर्ण नेट शॉर्ट पोझिशन्समुळे घसरणीचा दबाव वाढला. अमेरिका-भारत दर वाटाघाटींवरील अनिश्चितता आणि ईसीबीने यथास्थिती राखल्याने गुंतवणूकदारांच्या भावना नाजूक रा हिल्या, व्यापारातील घडामोडींच्या चलनवाढीच्या परिणामांवर स्पष्ट अंतर्दृष्टी येईपर्यंत दर कपात पुढे ढकलण्यात आली. गेल्या २-३ महिन्यांतील मंदावलेल्या उत्पन्न हंगामामुळे आणि सततच्या एफआयआय विक्रीमुळे डीआयआयच्या गुंतवणूकीतील मंदावलेला प्र वाह सध्याच्या बाजारावर परिणाम करत आहे.'

आजच्या बाजारातील एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,'अमेरिका आणि जपान आणि युरोपियन युनियन सारख्या व्यापारी भागीदारांमधील टॅरिफ करारांच्या अपेक्षा कमी झाल्यामुळे सोन्याचा भाव आणखी २५ डॉल र्सने घसरून ३३४५ डॉलर्सवर आला, जो ०.७०% कमी आहे. या घडामोडींमुळे सोन्याचे भाव अस्थिर राहू शकतात, विशेषतः उच्च पातळीवर. आता लक्ष पुढील आठवड्यात होणाऱ्या फेडच्या दर निर्णयाकडे वळले आहे, जे पुढील किमतीच्या दिशेने महत्त्वाचे ठरे ल. देशांतर्गत बाजारात, रुपयाच्या घसरणीमुळे घसरणीला चालना मिळाली, ज्यामुळे MCX सोन्याची घसरण ०.५०% ९८,२०० पातळीपर्यंत मर्यादित झाली. जागतिक संकेतांमध्ये मंदी आल्यामुळे, सोन्याची अल्पकालीन श्रेणी ९७०००- ९९००० पातळीपर्यंत खाली आली आहे.'

आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,'निफ्टी २४,९०० च्या महत्त्वपूर्ण आधार पातळीच्या खाली घसरल्याने विक्रीचा दबाव कायम राहिला. शिवाय तो अनेक सत्रांमध्ये पहिल्यांदाच ५०-दिवसांच्या घातांकीय मूव्हिंग सरासरी (५०EMA) लेवलच्या खाली बंद झाला आहे, जो चालू ट्रेंडमध्ये अर्थपूर्ण कमकुवतपणा दर्शवितो. याव्यतिरिक्त, निर्देशांक आता दैनंदिन वेळेच्या फ्रेमवर मागील स्विंग हायच्या झोनमध्ये परत आला आहे, जो संभाव्य ट्रेंड रिव्हर्सलला आणखी अधोरेखित करतो. सध्याची सेटअप विशेषतः कमकुवत दिसते आणि सखोल सुधारणा होण्याची शक्यता सूचित करते. जर निफ्टी पुढील एक किंवा दोन सत्रांमध्ये २४९०० पातळीच्या वरची पातळी पुन्हा मिळवण्यात अपयशी ठरला, तर तेजींना मोठ्या अल्पकालीन आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. नकारात्मक बाजूने, तात्काळ आधार २४७०० पातळीवर दिसतो आणि त्यानंतर २४५०० पातळीवर येतो वरच्या बाजूने, प्रतिकार (Resistance) आता २५००० पातळीच्या आसपास आहे.'

यामुळे एकूणच बाजारातील परिस्थिती पाहता ती अस्थिरतेचीच नोंद करते. त्यामुळे आगामी आठवड्यात काय घडामोडी घडतील याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >