
शिवसेनेचा महापौर करणार : टायरवाले
अ.नगर : महापालिका निवडणुकीचे आता पडघम वाजू लागले असून सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी चालविली आहे. त्यातच सर्वपक्षीयांकडून मनपावर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी आटापिटा सुरु आहे. महापालिका भ्रष्टाचारमुक्त करुन शिवसेनेचा महापौर करणार असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बाबूशेट टायरवाले यांनी सांगितले आहे.अहिल्यानगर महापालिकेवर दोन वर्षापासून प्रशासक असल्यामुळे नागरिकांचे मूलभूत प्रश्न वेळेवर मार्गी लागत नाही.शहरामध्ये स्वच्छतेचा निर्माण झाला असून रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी कचऱ्याचे मोठमोठे ढिगारे पाहायला मिळत आहे. घंटागाडी आठ-आठ दिवस नागरिकांच्या घरी कचरा संकलनासाठी येत नाही. नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही, १५ वर्षा पासून फेज टू योजनेचे काम सुरू आहे. अजून देखील काही उपनगरामध्ये काही ठिकाणी नागरिकांना नळाद्व-प्रश्नारे पाणी मिळत नाही. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांना नळाद्वारे पाणी देण्याची घो-षणा करत आहे. मात्र प्रशासक योजनांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असतात. नगर महापालिकेतील नगररचना विभागाचा सावळा गोंधळ नगरकरांनी अनुभवला आहे.नागरिकांनी जर बांधण्यासाठी म हापालिकेकडे मंजुरीसाठी फाईल दिली जाते.मात्र ती वेळेवर होत नाही.एकीकडे महापालिकेच्या शाळा बंद पडत आहे.सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहत आहे. अमृत भुयारी गटात योजना अजून पर्यंत सुरू झाली नाही. कोट्यावधी रुपये खर्च करूनही योजना यशस्वी होताना दिसत नाही. या कामाकडे महापालिका प्रशास नाचे अक्षरशा दुर्लक्ष असून फक्त भ्रष्टाचार सुरू आहे.