Saturday, August 2, 2025

School roof Collapses: वर्ग सुरू असताना सरकारी शाळेचे छत कोसळले, अनेक मुलं ढिगाऱ्याखाली, ४ मुलांचा मृत्यू

School roof Collapses: वर्ग सुरू असताना सरकारी शाळेचे छत कोसळले, अनेक मुलं ढिगाऱ्याखाली, ४ मुलांचा मृत्यू

राजस्थानमध्ये मोठी दुर्घटना, वर्गात सुमारे ६० मुले उपस्थित होती


झारखंड: राजस्थानमधील झालावाड येथे शाळकरी मुलांसोबत एक मोठी दुर्घटना घडली आहे. परिसरात एका शाळेचे छत कोसळल्याचे वृत्त आहे, ज्यामध्ये अनेक मुले गाडल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

झालावाड जिल्ह्यातील मनोहर पोलीस स्टेशन परिसरातील पिपलोडी येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळेचे छत अचानक कोसळले. वर्गात उपस्थित असलेले विद्यार्थी त्याखाली गाडले गेले. मिळालेल्या माहितीनुसार, वर्गात सुमारे ६० मुले उपस्थित होती, त्यापैकी पंचवीस मुले ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.

शाळेचे छत कोसळल्याने झालेल्या अपघातानंतर परिसरातील लोक मदतीसाठी पोहोचले. घटनास्थळी लोकांची गर्दी जमली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न लोकांनी सुरू केला.
Comments
Add Comment