Saturday, August 30, 2025

'आता व्हर्च्युअली क्वालिटीआधारित खरेदी करा व फ्री होम डिलिव्हरीही मिळवा'

'आता व्हर्च्युअली क्वालिटीआधारित खरेदी करा व फ्री होम डिलिव्हरीही मिळवा'
लव्हलोकलचे 'क्वालिटी कॉमर्स'ला प्रोत्साहन स्थानिक दुकानदारांच्या साथीने व्हिडिओ-आधारित खरेदी आणि २ तासांत फ्री होम डिलिव्हरी सुविधा मुंबई:भारतातील ऑनलाइन किराणा बाजारपेठ वेगाने बदलत असताना मुंबईस्थित हायपरलोकल ई-कॉमर्स ॲप (Hyperlocal E Commerce App) लव्हलोकल (LoveLocal) क्वालिटी कॉमर्स मॉडेलसह क्विक कॉमर्सला एक शक्तिशाली पर्याय म्‍हणून पुढे ये त आहे.याविषयी बोलताना कंपनीने म्हटले,'हे मॉडेल केवळ जलद वितरणावरच लक्ष केंद्रित करत नाही तर गुणवत्ता,विश्वास आणि स्थानिक दुकानदारांना सक्षम बनविण्यावर देखील लक्ष केंद्रित करते. लव्हलोकलचे हायपरलोकल ॲप ग्राहकांना सोयीस्कर आणि विश्वासाला प्राधान्य देणारा अनुभव देण्यासाठी डिझाइन केलेले आहे.' बदलत्या ग्राहक ट्रेंडनुसार लव्हलोकल 'क्वालिटी कॉमर्स'ला प्रोत्साहन देत असून फळे, भाज्या, मांस, मासे आणि निवडक किराणा उत्पादनांचा ताजेपणा आणि गुणवत्तेच्या खऱ्या चिंता दूर करत आहे. कंपनीच्या माहितीनुसार,स्थानीय स्टोअर्ससोबत भागीदारी केल्याने सर्व ऑर्डरवर मोफत डिलिव्हरी आणि मोफत बदलीची खात्री येथे मिळते. व्हिडिओ-आधारित खरेदी अनुभवासारख्या लव्हलोकलच्या नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांमुळे ग्राहकांना त्यांच्या परिसराती ल स्टोअरमध्ये व्हर्च्युअली पाऊल टाकता येते आणि शेल्फवर काय आहे ते पाहता येते. ब्रँड दोन तासांच्या आत उत्पादने वितरित केली जाण्‍याची खात्री देत असल्याने ताजी उत्पादने घरपोच मिळतात. ग्राहकांच्या विविध खरेदी गरजा चांगल्याप्रकारे पूर्ण करण्यासा ठी ते स्लॉटेड डिलिव्हरी आणि एक्सप्रेस डिलिव्हरी पर्याय देखील सुरू करत आहेत. याविषयी माध्यमांना लव्हलोकलच्या संस्थापक आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी आकांक्षा हजारी म्हणाल्या,'ताज्या किराणा मालाची खरेदी करताना ग्राहक गुणवत्ता आणि विश्वासाला प्रथम प्राधान्‍य देतात. आम्ही स्‍थानिक किरकोळ विक्रेत्‍यांवर ग्राहकांच्‍या असले ल्‍या विश्वासाला सार्थ ठरत या समस्‍येचे निराकरण करतो. एक लाख स्टोअर्सना ऑनलाइन जोडून भारतातील सर्वात मोठे आणि समावेशक ई-कॉमर्स नेटवर्क तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.खरेदीचे भविष्य एखाद्या दूरवर असणा-या गोदामात नाही तर तुमच्या स्वतःच्या विश्वासू दुकानदाराकडे आहे जिथे डिलिव्हरी केवळ जलदच नाही तर अचूक देखील होते. यालाच क्वालिटी कॉमर्स म्हणतात.' लव्हलोकल पुढील १२ महिन्यांत १५ पट वाढीसह २०२६ पर्यंत अनेक नवीन शहरांमध्ये विस्तार करण्याची योजना आखत आहे. हे एक दीर्घकालीन परिणामांसाठी डिझाइन केलेले प्रमाणबद्ध, तंत्रज्ञान-सक्षम (Tech Enabled) मॉडेल आहे. लोकांना त्यांच्या विश्वा सार्ह परिसरातील दुकानांद्वारे ऑनलाइन ताज्या किराणा मालाची उत्पादने पुरवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. यापूर्वीचा सर्वेक्षणानुसार, भारतातील फक्‍त ७ टक्‍के कुटुंबे ऑनलाइन फळे आणि भाज्या खरेदी करतात. २४००० भारतीय ग्राहकांचे सर्वेक्षण केलेल्या फाय नान्शियल टाइम्सच्या अलिकडच्या सर्व्हेक्षणातून निदर्शनास आले की जवळजवळ ८०% ग्राहकांनी क्विक कॉमर्स आणि इतर इन्व्हेंटरी-आधारित प्लॅटफॉर्मवरून ताजे उत्पादन खरेदी करण्याबद्दल असमाधान व्यक्त केले आणि ते पुन्हा एकदा त्यांच्या स्थानिक किर कोळ विक्रेत्यांकडे वळत आहेत. कंपनीचा दावा आहे की, लव्हलोकल इतर ऑनलाइन किराणा प्लॅटफॉर्मच्या तुलनेत ३०% अधिक ताजे उत्पादन निवड आणि स्पर्धात्मक किंमत देते. डिजिटल तंत्रज्ञान आणि स्थानिक दुकानांचा विश्वास यांचा मेळ घालून लव्हलोकल दररोजच्या खरेदीसाठी एक न वीन मानक स्थापित करत आहे. मुंबईत ६०० हून अधिक दुकानांचे डिजिटायझेशन केल्यानंतर लव्हलोकल आता अशा भविष्याकडे वाटचाल करत आहे जिथे लहान दुकानदार भारताच्या डिजिटल रिटेल अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी असतील. आजपर्यंत, कंपनीने व्हल्कन कॅपिटल, अँड्रीसेन होरोविट्झ, ब्लूम व्हेंचर्स आणि अनेक प्रसिद्ध संस्थापकांकडून जवळजवळ ३० दशलक्ष यूएस डॉलर उभारले आहेत.
Comments
Add Comment