केंद्र सरकारकडून ALTT, ULLU सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, संपूर्ण यादी पहा

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून सॉफ्ट पॉर्न कंटेंटवर कडक कारवाई करण्यात आली आहे. सरकारने एक अधिसूचना जारी केली असून इंटरनेट सेवा प्रदात्यांना देशभरात असा सॉफ्ट पॉर्न कंटेंट दाखवणाऱ्या २५ वेबसाइट्स तात्काळ ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. उल्लू अ‍ॅप, एएलटीटी, डेसिफ्लिक्स आणि बिग शॉट्स सारख्या सेमी पॉर्न प्रसारित करणाऱ्या अ‍ॅप्सवर बंदी आणण्यात आली आहे.


भारतामध्ये कोरोना काळामध्ये पॉर्न वेबसाईटवर बंदी आणल्यानंतर सॉफ्ट पॉर्न कंटेंट दाखविण्यास विविध कंपन्यांनी सुरुवात केली होती. यात उल्लू अ‍ॅप, एएलटीटी सारख्या अ‍ॅप्सनी धुमाकूळ घातला होता. हे सर्व प्लॅटफॉर्म IT नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले. हे प्लॅटफॉर्म नियमांचे उल्लंघन करून अश्लील आणि आक्षेपार्ह सामग्री प्रसारित करत होते, त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. तरुण वर्गासह सर्वच वयोगटाला या अ‍ॅप्सनी चांगलीच भुरळ घातली होती. यामुळे तरुण पिढी देखील बिघडत चालली होती. याला आवर कसा घालावा, असा प्रश्न केंद्र सरकारसमोर होता. आता यावर मोठा निर्णय घेण्यात आला आहे.




इंटरनेट सेवा प्रदात्यांना देशभरात अशा प्रकारची सामग्री दाखवणाऱ्या २५ वेबसाइट तात्काळ ब्लॉक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ७९ (३) (ब) व IT नियम, २०२१ च्या नियम ३(१)(ड) नुसार कारवाई केली आहे. इंटरनेट प्रोव्हायडरना मध्यस्थ घोषित करण्यात आले आहे. त्यांच्यावरच ही जबाबदारी देण्यात आली आहे.



या ॲप्स आणि वेबसाईटवर बंदी


उल्लू, एएलटीटी, बिग शॉट्स अ‍ॅप, डेसिफ्लिक्स, बूमेक्स, नवरासा लाईट, गुलाब अ‍ॅप, कंगन अ‍ॅप, बुल अ‍ॅप, जलवा अ‍ॅप, वॉव एंटरटेनमेंट, लूक एंटरटेनमेंट, हिटप्राइम, फेनिओ, शोएक्स, सोल टॉकीज, अड्डा टीव्ही, हॉटएक्स व्हीआयपी, हलचल अ‍ॅप, मूडएक्स, निऑनएक्स व्हीआयपी, फुगी, मोजफ्लिक्स, ट्रायफ्लिक्स या सॉफ्ट पॉर्न दाखविणाऱ्या प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.

Comments
Add Comment

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये

आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली:

दर्शनबंद! केदारनाथ आणि बद्रीनाथचे दरवाजे बंद करणार!

डेहराडून : बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे यावर्षी मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी पहाटे २:५६ वाजता बंद करण्यात येणार आहेत. तर