
नवी दिल्ली : भारताने आंध्र प्रदेशमधील चाचणी तळावरुन ड्रोनद्वारे क्षेपणास्त्र चाचणी केली. ही चाचणी यशस्वी झाली. यामुळे संरक्षण साहित्य निर्मितीत आत्मनिर्भरतेच्या दिशेने देशाचे आणखी एक दमदार पाऊल पडले आहे. डीआरडीओने (Defence Research and Development Organisation) ड्रोनद्वारे यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी घेतली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एक्स पोस्ट करुन या उल्लेखनीय कामगिरीसाठी भारतीय संशोधकांचे आणि तंत्रज्ञांचे कौतुक केले. डीआरडीओने केलेल्या यशस्वी प्रयोगामुळे भारताच्या क्षेपणास्त्र सामर्थ्यात आणखी वाढ होण्यास मदत होणार आहे.
In a major boost to India’s defence capabilities, @DRDO_India has successfully carried out flight trials of UAV Launched Precision Guided Missile (ULPGM)-V3 in the National Open Area Range (NOAR), test range in Kurnool, Andhra Pradesh. Congratulations to DRDO and the industry… pic.twitter.com/KR4gzafMoQ
— Rajnath Singh (@rajnathsingh) July 25, 2025
आंध्र प्रदेशमधील कुर्नूल येथील नॅशनल ओपन एरिया रेंजमध्ये डीआरडीओने ड्रोनद्वारे यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी घेतली. चाचणीसाठी प्रिसिजन गाईडेड मिसाईलचा वापर करण्यात आला. या प्रकल्पात डीआरडीओ, डीसीपीपी (Data Security Council of India), एमएसएमई (Micro, Small, and Medium Enterprises) आणि स्टार्टअप सहभागी झाले होते. संरक्षणमंत्र्यांनी प्रकल्पात सहभागी असलेल्या सर्वांचे यशस्वी चाचणीसाठी अभिनंदन केले. भारतीय उद्योग आता महत्त्वपूर्ण संरक्षण तंत्रज्ञान आत्मसात करण्यास आणि उत्पादन करण्यास तयार आहे, असेही संरक्षणमंत्री म्हणाले.
ड्रोनद्वारे क्षेपणास्त्र चाचणीच्या प्रकल्पात आणखी काही प्रयोग होणार असल्याचे वृत्त आहे. वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्र ड्रोनद्वारे प्रक्षेपित करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. यामुळे लढाईत ड्रोनचा वापर वाढवण्यास मदत होणार आहे. जेव्हा लढाईत लढाऊ विमान सहभागी होते त्यावेळी कोट्यवधी रुपयांचे विमान आणि त्यातील वैमानिक यांना सतत संकटांतून मार्ग काढावा लागतो. हा धोका ड्रोनच्या प्रभावी वापराने कमी करता येणार आहे. यामुळे निश्चित असलेल्या लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी भारताकडून भविष्यात ड्रोनचा वापर वाढण्याची शक्यता आहे. या शक्यतेला ड्रोनद्वारे यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी झाल्यामुळे आणखी बळ मिळाले आहे.