Friday, August 15, 2025

PM Modi in Maldive : PM मोदींची पॉवर! मालदीवच सर्व कॅबिनेट PM मोदींच्या स्वागताला विमानतळावर

PM Modi in Maldive : PM मोदींची पॉवर! मालदीवच सर्व कॅबिनेट PM मोदींच्या स्वागताला विमानतळावर
मालदीव : पंतप्रधान मोदी नुकताच ब्रिटनचा दौरा संपवून मालदीवला पोहोचले आहेत. शुक्रवारी सकाळी ते राजधानी मालेमध्ये दाखल झाले. विमानतळावर PM मोदींच्या स्वागताला राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू स्वत: हजर होतेच. मात्र, सर्व मंत्रिमंडळ मोदींच्या स्वागतासाठी तिथे हजार होतं. राष्ट्रपती मुइज्जू यांनी पीएम मोदींची गळाभेट घेऊन त्यांचं स्वागत केलं. यावेळी त्यांचं अख्ख कॅबिनेट मोदींच्या स्वागताला विमानतळावर हजर होतं. मालदीवच्या परराष्ट्र मंत्र्यांपासून ते संरक्षण मंत्री, अर्थ मंत्री आणि होमलँड सिक्युरिटीचे मंत्री त्यात होते. PM मोदी राष्ट्रपती मुइज्जू यांच्या निमंत्रणावरुन मालदीवला गेले आहेत. मालदीवच्या ६०व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आलेलं आहे. याच वर्षी भारत आणि मालदीवच्या राजनैतिक संबंधांना ६०वर्ष पूर्ण होत आहेत.

भारत अधिक विश्वासू आणि सच्चा भागीदार

भारत आणि मालदीव या दोघांची मैत्री दक्षिण आशियामधील सर्वात महत्त्वाची रणनितीक भागीदारी मानली जाते. २ वर्षांपूर्वी दोन्ही देशातील संबंध काही कारणास्तव ताणले गेले होते. याला मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू जबाबदार होते. त्यांनी मालदीवची सत्ता मिळवण्यासाठी इंडिया आऊटचा नारा दिला होता. त्यावेळी अनेक एक्सपर्टना वाटलेलं की, भारताने आपल्या जवळच्या समुद्र भागीदाराला गमावलंय. काहीजण याला भारतासाठी धक्का म्हणत होते. काहीजण दोन्ही देशांच्या भविष्याबद्दल चिंतित होते. पण या उलट झालं. पीएम मोदी यांनी कूटनिती आणि Soft Diplomacy च्या बळावर भारताच महत्त्व मालदीवच्या नव्या नेतृत्वाच्या लक्षात आणून दिलं. डॉ. मोइज्जु यांना सुद्धा समजलं की, चीनच्या तुलनेत भारत अधिक विश्वासू आणि संकट काळातील सच्चा भागीदार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कितवा दौरा?

मोदी २०१८ साली पहिल्यांदा राष्ट्रपती सोलिह यांच्या शपथ ग्रहणाच्यावेळी मालदीवला गेले होते. त्यानंतर २०१९ साली पीएम मोदी यांनी मालदीवचा द्विपक्षीय दौरा केला.आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ३रा मालदीव दौरा आहे. पीएम मोदी राष्ट्रपती मुइज्जू यांच्या निमंत्रणावरुन मालदीवला चालले आहेत. मालदीवच्या ६० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदींचा मालदीव दौरा चीनसाठी एक संदेश असणार आहे. कारण भारताच्या या जुन्या मित्राला आपल्या बाजूला वळवण्याचा चीनचा प्रयत्न होता.
Comments
Add Comment