Sunday, October 26, 2025
Happy Diwali

शनीमूर्तीवर भाविकांना करता येणार जल अर्पण, श्रावण महिन्यात भाविकांना सेवेची संधी

शनीमूर्तीवर भाविकांना करता येणार जल अर्पण, श्रावण महिन्यात भाविकांना सेवेची संधी
शनीशिंगणापूर (प्रतिनिधी) : श्रावण महिन्यामध्ये भाविकांना शनिदेवाची सेवा मिळावी म्हणून पहाटे ५ ते ७या वेळेत शनिमूर्तीला जलअर्पण करण्याची संधी मिळणार आहे. भाविकांना ओल्या वस्त्रांनी चौथऱ्यावर परवानगी देण्यात येणार आहे. ही सेवा फक्त श्रावण महिन्यासाठीच असेल असा निर्णय शनैश्वर देवस्थानच्या वतीने घेण्यात आला आहे. श्रावण महिन्याला २५ जुलैपासून म्हणजे आजपासून प्रारंभ होत आहे पहाटे ५ ते सकाळी ७ वाजेपर्यंत शनिशिंगणापूर येथे सर्व भाविकांसाठी शनी देवाच्या चौथऱ्यावर जाऊन जल अर्पण करता येणार आहे. ही सेवा श्रावण मासात म्हणजे २५ जुलै ते २३ ऑगस्ट २०२५ या कालावधीत सुरू राहणार आहे. शनिशिंगणापूर येथे परिसरातील रोज हजारो भाविक भक्त पहाटे पायी येऊन मंदिर परिसरात स्नान करून ओल्या वस्त्राने शनी चौथऱ्यावर जाऊन कळशी व लोट्याने जल अर्पण करतात. श्रवण महिन्यात अनेक भाविक भंडारा प्रसादाचे आयोजन करत असतात.
Comments
Add Comment