कंपनीने दिलेल्या माहितीनुसार,कामकाजातून मिळालेल्या महसूलात (Revenue from Operations ) मध्ये ३.९२% वाढ झाली. ज्यामध्ये हा महसूल मागील वर्षाच्या तिमाहीतील ६६९४ कोटींच्या तुलनेत वाढत या तिमाहीत ६९५७ कोटींवर पोहोचला आहे.कंपनी च्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) यामध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ६% वाढ नोंदविण्यात आली. मागील वर्षाच्या तिमाहीतील तुलनेत कंपनीला १२९५ कोटींवर पोहोचला आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, करपूर्व नफ्यात (PBT) १७७० कोटींवर पोहोच ला आहे जो मागील वर्षाच्या तिमाहीत (Q1) १६११ कोटी रुपये होता. कंपनीच्या खर्चातही (Expenses) इयर ऑन इयर बेसिसवर ४% वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या ४९७८ कोटींच्या तुल नेत वाढत या तिमाहीत ५१७९ कोटींवर खर्च पोहोचला. माहितीनुसार,जूनपर्यंत सिप्लाकडे १०,३७९ कोटी रुपयांची निव्वळ रोख शिल्लक (Net Cash Balance) होती. संशोधन आणि विकास गुंतवणूक ४३२ कोटी रुपये (विक्रीच्या ६.२ टक्के) होती, जी पाइपला इन विकास आणि फाइलिंगवर खर्च झाली आहे. कंपनीने निकालावर म्हटले आहे की,' सिप्लाने मुख्य बाजारपेठांचा विस्तार करणे, प्रमुख ब्रँड मजबूत करणे आणि शाश्वत वाढीसाठी संशोधन आणि विकासाद्वारे नावीन्यपूर्णतेला चालना देणे यावर लक्ष केंद्रित केले आहे.