'सरकार आमची मुलं परत आणू शकतं का?' पालकांचा आक्रोश

झालावाड, राजस्थान : राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातल्या पीपलोद गावात जे घडलं, त्याने संपूर्ण गाव हादरलं आहे. शाळेच्या जीर्ण झालेल्या इमारतीचा छप्पर कोसळला… आणि सात निरागस मुलांचं आयुष्य एका क्षणात संपलं. आणखी तीसहून अधिक विद्यार्थी जखमी झालेत. त्यातील दहा जण मृत्यूशी झुंज देतायत. पण या साऱ्यात एकच प्रश्न सारं गाव विचारतंय, "आमची गेलेली मुलं परत येणार आहेत का?"


या शाळेची अवस्था कुणालाही माहित नव्हती, असं नाही. वर्षानुवर्षं ग्रामस्थांनी प्रशासनाला विनवण्या केल्या. इमारत मोडकळीला आली आहे, दुरुस्ती करा… पण सगळ्यांनी कानाडोळा केला. जी दुरुस्ती झाली, ती केवळ कागदोपत्री. आता तीच इमारत पाचवी ते सातवीच्या वर्गात बसलेल्या मुलांसाठी मृत्यूचा सापळा ठरली.


"माझं पोरगं सकाळी हसतखेळत शाळेत गेलं होतं… दुपारी त्याचं झाकलेलं प्रेत परत आलं… सरकारनं काय केलंय? आता ते मला माझं पोरगं परत देईल का?" – एक आई तळमळून ओरडते. तिचे अश्रू थांबत नाहीत… आणि सारं गाव स्तब्ध झालेलं असतं.



ही दुर्घटना सकाळच्या प्रार्थनेनंतर घडली. मुलं वर्गात गेली आणि काही क्षणांत सातवीच्या वर्गाचा छप्पर अंगावर कोसळला. काही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. बाकी जखमींना गावकऱ्यांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन ढिगाऱ्यातून बाहेर काढलं. प्रशासन आलं, पण उशिरा. ज्या वेळी ते आले, तेव्हा काही नाजूक जीव आधीच निघून गेले होते.


"आता नुकसानभरपाई देणार, थोडंफार पैसा देणार… पण आमची मुलं परत मिळणार का?" – या एका प्रश्नात हजारो आईबापांचं दुःख आहे. सरकार, प्रशासन, राजकारणी, सगळ्यांनी जबाबदारी नाकारली आणि किंमत चुकवली ती या छोट्या जीवांनी.


आज पीपलोद गाव शोकमग्न आहे… पण त्या शोकाच्या आड एक संताप धुमसतोय. ही दुर्घटना नव्हे, तर व्यवस्थेच्या बेफिकिरीचं हत्याकांड आहे आणि त्या हत्येची जबाबदारी कोण घेणार?

Comments
Add Comment

भयंकर धक्कादायक! दिवाळीत 'कार्बाइड गन'मुळे १४ मुलांना कायमचे अंधत्व; १२५ हून अधिक जखमी!

भोपाळ : दरवर्षी दिवाळीला फटाक्यांचे वेगवेगळे ट्रेंड समोर येत असातात, यामध्ये चकरीपासून ते रॉकेटपर्यंत वेगवेगळे

सैन्यासाठी ७९,००० कोटींचे मोठे निर्णय!

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने आज भारतीय

देशभरात मतदार यादी बनवण्याचे मोठे काम सुरू!

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुडुचेरी, तामिळनाडूत सर्वप्रथम एसआयआर प्रक्रिया नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने देशभरातील

महिला आणि ट्रान्सजेंडरसाठी मोफत प्रवास; काय आहे 'सहेली स्मार्ट कार्ड' योजना?

नवी दिल्ली : भाऊबीजच्या निमित्ताने दिल्ली सरकार महिला आणि ट्रान्सजेंडर लोकांना एक मोठी भेट देणार आहे. आजपासून

तेजस्वी यादव '४२०' आरोपी, त्यांच्याकडे विश्वासार्हताच नाही, बिहारला मोदी-नितीश यांचे 'डबल इंजिन' सरकारच हवे!; रवी शंकर प्रसाद यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप खासदार रवी शंकर प्रसाद यांनी आज महागठबंधनचे

आता विक्रीआधी होणार प्रत्येक औषधाची सखोल तपासणी

नवी दिल्ली : लहान मुलांना खोकला झाल्यावर औषध म्हणून दिल्या जाणाऱ्या कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे मध्य प्रदेशमध्ये २४