Thursday, October 23, 2025
Happy Diwali

Sneha Wagh : केतकी चितळेनंतर स्नेहा वाघ: 'मराठी मालिका आता नाही, कारण माझी भाषा बदललीये!'

Sneha Wagh : केतकी चितळेनंतर स्नेहा वाघ: 'मराठी मालिका आता नाही, कारण माझी भाषा बदललीये!'

मुंबई : मराठी कलाकार आणि भाषेवरून सध्या वाद पेटला आहे. अभिनेत्री केतकी चितळेच्या 'मराठी न बोलल्यास भोकं पडणार आहेत का?' या वक्तव्यानंतर आता मराठमोळी अभिनेत्री स्नेहा वाघनेही त्यात भर घातली आहे. "मला टेलिव्हिजनवर काम करायला आवडेल, पण मराठीत नाही, कारण माझी भाषा थोडी बदलली आहे," असे वक्तव्य स्नेहाने एका मुलाखतीत केले आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by Sneha G Wagh (@snehawagh)

मराठी टेलिव्हिजनमधून हिंदीत गेलेल्या अनेक कलाकारांपैकी स्नेहा वाघ हे एक नाव आहे. 'बिग बॉस मराठी सीझन ३' मध्ये दिसलेल्या स्नेहाने 'अधुरी एक कहाणी', 'या गोजिरवाण्या घरात' यांसारख्या मालिकांमधून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर तिने हिंदीतही भरपूर काम केले. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या संघर्षाच्या दिवसांपासून ते आतापर्यंतच्या प्रवासाविषयी सांगितले. "एक व्यावसायिक कलाकार म्हणून मला फारसा संघर्ष करावा लागला नाही," असे ती म्हणाली.

स्नेहाने यावेळी तिच्या भाषेतील बदलावर लक्ष वेधले. ती म्हणाली, "मी जेव्हा हिंदीमध्ये काम करायला सुरुवात केली, तेव्हा माझी भाषा ऐकून माझ्या दिग्दर्शकांनी त्यांच्याकडील छडीने मारलं होतं. 'तुझी भाषा मराठी नाही, हिंदी नाही, ही कोणती भाषा आहे?' असं विचारलं होतं." त्यावेळी दिग्दर्शकांनी तिला सांगितले की, "तू ज्या भाषेत विचार करशील ती तुझी भाषा चांगली होईल. त्यामुळे जर तुमची भाषा चांगली व्हायला हवी असेल, तर तुम्ही त्या भाषेत विचार करायला पाहिजे."

स्नेहाने पुढे सांगितले की, "त्यामुळे माझ्या भाषेत बदल झाले, आता मी वृंदावनला राहत असल्यामुळे मला ब्रजभाषा यायला लागली आहे."

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >