Mantralay: मंत्रालयात दुर्घटना, सातव्या मजल्यावर सिलिंग कोसळलं

मुंबई: मंत्रालयातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आज सकाळी कामाच्या वेळेमध्ये मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील सीलिंग अचानक कोसळलं. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.  मात्र या घटनेमुळे सदर ठिकाणी काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता.


मुळात, मंत्रालयात विविध कामांसाठी दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे मंत्रालयात अशाप्रकारे दुर्घटना होणे ही चिंतेचीच गोष्ट म्हणावी लागेल.



मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या बाहेर दुर्घटना


मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयात सकाळी, आज दिनांक २५ जुलैला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या बाहेर सिलिंगचा काही भाग कोसळला. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी किंवा कोणी जखमी झालेलं नाही. सामान्यतः, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या बाहेर रुग्णांच्या नातेवाईकांची रांग लागलेली असते. रुग्णाला मदतनिधी मिळवून देण्यासाठी लोक इथे येत असतात, आणि याच ठिकाणच सिलिंग कोसळलं.



मंत्रालयाच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह 


जे सिलिंग कोसळलं, ते गंजलेलं लोखंड होतं. त्यामुळे सिलिंगचा हा भाग कोसळला. जो ढिगारा खाली आला, तो सफाई कर्मचाऱ्यांनी वेळीच हटवला. दरम्यान या घटनेमुळे मंत्रालयाच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मंत्रालयातून महत्त्वाचे निर्णय होत असतात. मंत्रालय प्रशासनाचा कणा आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांची कार्यालय मंत्रालयात आहेत. अशातच या घटनेमुळे विविध चर्चांना आता उधाण आले आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि