Friday, August 15, 2025

Mantralay: मंत्रालयात दुर्घटना, सातव्या मजल्यावर सिलिंग कोसळलं

Mantralay: मंत्रालयात दुर्घटना, सातव्या मजल्यावर सिलिंग कोसळलं

मुंबई: मंत्रालयातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आज सकाळी कामाच्या वेळेमध्ये मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील सीलिंग अचानक कोसळलं. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.  मात्र या घटनेमुळे सदर ठिकाणी काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता.

मुळात, मंत्रालयात विविध कामांसाठी दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे मंत्रालयात अशाप्रकारे दुर्घटना होणे ही चिंतेचीच गोष्ट म्हणावी लागेल.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या बाहेर दुर्घटना

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयात सकाळी, आज दिनांक २५ जुलैला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या बाहेर सिलिंगचा काही भाग कोसळला. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी किंवा कोणी जखमी झालेलं नाही. सामान्यतः, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या बाहेर रुग्णांच्या नातेवाईकांची रांग लागलेली असते. रुग्णाला मदतनिधी मिळवून देण्यासाठी लोक इथे येत असतात, आणि याच ठिकाणच सिलिंग कोसळलं.

मंत्रालयाच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह 

जे सिलिंग कोसळलं, ते गंजलेलं लोखंड होतं. त्यामुळे सिलिंगचा हा भाग कोसळला. जो ढिगारा खाली आला, तो सफाई कर्मचाऱ्यांनी वेळीच हटवला. दरम्यान या घटनेमुळे मंत्रालयाच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मंत्रालयातून महत्त्वाचे निर्णय होत असतात. मंत्रालय प्रशासनाचा कणा आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांची कार्यालय मंत्रालयात आहेत. अशातच या घटनेमुळे विविध चर्चांना आता उधाण आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा