Saturday, August 2, 2025

Kolhapur Accident: महाविद्यालयीन मुलींच्या घोळक्यात घुसली कार, एकीचा मृत्यू तर ३ गंभीर जखमी

Kolhapur Accident: महाविद्यालयीन मुलींच्या घोळक्यात घुसली कार, एकीचा मृत्यू तर ३ गंभीर जखमी

कोल्हापुर: कोल्हापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका भरधाव चारचाकीनं महाविद्यालयीन विद्यार्थीनींना धडक दिल्याची घटना समोर आली आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , कुरुकली भोगावती कॉलेजच्या रिक्वेस्ट बस स्टँड इथं ही घटना घडली आहे. या चारचाकीच्या धडकेत एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाला आहे. तर 3 विद्यार्थीनी गंभीर जखमी झाल्या आहेत. प्रज्ञा दशरथ कांबळे ( वय १८) असं मृत्यू झालेल्या कौलवं येथील विद्यार्थीनीचं नाव आहे. तर जखमी झालेल्या तरुणींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.



नेमकं काय घडलं?


कॉलेज संपल्यानंतर बस स्टँडवर उभारलेल्या मुलींच्या घोळक्यात भरधाव कार घुसल्यानं हा अपघात झाला. दरम्यान, या घटनेनंतर कारचालकासह दोघा अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घटनास्थळासह सीपीआर रुग्णालयासमोर नातेवाईक आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.


दरम्यान, ताब्यात घेतलेल्या चालकाची पोलिस कसून चौकशी करत आहेत. नेमका हा प्रकार घडला कसा याचीही पोलिस चौकशी करत आहेत. या अपघातात जखमी झालेल्या मुलींवर उपचार सुरु आहेत. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा